Join us

गजरे विकणा-या महिलेवर का संतापली मलायका अरोरा, व्हिडीओ पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 16:04 IST

एका गजरे विकणा-या महिलेने मलायकाला चांगलेच वैतागून सोडले. 

ठळक मुद्देमलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करतेय. अर्जुन मलायकापेक्षा 11 वर्षांनी लहान आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी अनेकदा आपल्या चाहत्यांसोबत वा सामान्य लोकांसोबत सेल्फी घेताना वा त्यांना ऑटोग्राफ देताना दिसतात. पण अनेकदा लोक असे काही क्रेजी होतात की, सेलिब्रिटींच्या नाकीनाऊ आणतात. अलीकडे मलायका अरोरासोबत असेच काही घडले. चाहतीने नाही तर एका गजरे विकणा-या महिलेने मलायकाला वैतागून सोडले. होय, मलायका जिम सेशन पूर्ण करून बाहेर निघाली. याचदरम्यान  गजरे विकणा-या महिलेने मलायकाला गाठले. गजरा घे, म्हणून ती मलायकाच्या मागे पडली. या महिलेला  हसून नकार देत मलायका आपल्या कारकडे वळली. पण कारमध्ये बसल्यावर गजरे विकणारी ती महिला मलायकाचा पिच्छा सोडेना. अगदी कारमध्ये बसल्यावर या महिलेने एक गजरा मलायकाच्या अंगावर फेकला. मग मात्र मलायका भडकली. ती काही बोलली नाही. पण तिच्या चेह-यावरचा संताप स्पष्ट दिसला.

मलायकाच्या पाठोपाठ अमृता अरोरा, सीमा खान, अर्जुन रामपालची गर्लफ्रेन्ड गॅब्रिएला या सुद्धा जिममधून यावेळी बाहेर पडताना दिसल्या.मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करतेय. अर्जुन मलायकापेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. यावरून मलायका अनेकदा ट्रोलही झाली. पण मलायकाने या ट्रोलिंगची कधीच पर्वा केली नाही.

 रूपेरी पडद्यावर मलायकाचे फारसे दर्शन घडत नसले तरी  विविध पार्ट्या, इव्हेंट्स आणि सोहळे आणि फिटनेस व्हिडीओमधूनही तिचे दर्शन रसिकांना होत असते. तिची एक झलक पाहण्यासाठी रसिक आतुर असतात.  प्रत्यक्ष जीवनातही ती नेहमीच  ग्लॅमरस अंदाजात दिसते. फिटनेससाठी अक्षरश: वेडी असलेली मलायका न चुकता जिममध्ये जाते. जिमबाहेरचे तिचे जिम लूकही चर्चेत असतात.

टॅग्स :मलायका अरोरा