Join us

अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर 'या क्रिकेटरला डेट करतेय मलायका? चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 11:43 IST

अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कोणत्या क्रिकेटरला डेट करतेय मलायका? फोटो व्हायरल

अर्जुन कपूर (arjun kapoor) हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. अर्जुनला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. अर्जुन कपूरचं मलायका अरोरासोबत (malaika arora) रिलेशनशीप चांगलंच गाजलं. अर्जुन आणि मलायका यांचे एकमेकांना डेट करतानाचे फोटोही चांगलेच व्हायरल झाले होते. अर्जुन-मलायकाचं लग्न होत असतानाच दोघांच्या ब्रेकअपने सर्वांना धक्का बसला. अशातच अर्जुनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायका पुन्हा प्रेमात पडली असल्याची चर्चा रंगलीय. IPL मधील मलायकाचा एक फोटो व्हायरल झालाय. हा फोटो पाहून मलायकाला नवा बॉयफ्रेंड मिळाला आहे का? असा प्रश्न सर्वांना पडलाय.या क्रिकेटरला मलायका करतेय डेट 

मलायका अरोराचा IPL सामन्यातील एक फोटो व्हायरल झालाय. काल CSK vs RR ही मॅच होती. या मॅचमध्ये मलायका अरोराची उपस्थिती सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. या मॅचमध्ये मलायकाच्या बाजूला श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू कुमार संगकारा बसलेला दिसला. दोघांनीही RR ची जर्सी परिधान केली होती. हे फोटो पाहून अर्जुन आणि मलायका एकमेकांना डेट करत आहेत का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलाय. अर्जुनसोबत ब्रेकअपनंतर मलायका आणि संगकारामध्ये काहीतरी शिजतंय, असं सर्वांना वाटतंय. आता याविषयी मलायका किंवा संगकारा दोघांपैकी कोणीही काही बोललेलं नाही.

मलायका अरोराचं काहीच दिवसांपूर्वी अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतर मलायका आणि अर्जुन दोघंही सिंगल आहेत. अर्जुन ब्रेकअपनंतर अनेकदा प्रसारमाध्यमांवर समोर आला. परंतु मलायकाने ब्रेकअपनंतर कोणतंही वक्तव्य केलं नाहीये. मलायका सध्या तिचं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य प्रायव्हेट ठेवणं पसंत करतेय. आता मलायका आणि कुमार संगकारा खरंच एकमेकांना डेट करत आहेत? या प्रश्नाचं उत्तर लवकरच चाहत्यांना मिळेल, अशी आहे आहे.

टॅग्स :मलायका अरोरामलायका अरोराकुमार संगकाराइंडियन प्रिमियर लीग २०२५राजस्थान रॉयल्सचेन्नई सुपर किंग्स