मलायका अरोरा (Malaika Arora ) काल-परवाच एक्स-हसबण्ड अरबाज खानसोबत लंच डेट एन्जॉय करताना दिसली होती. मलायका व अरबाजचा मुलगा अरहान खान (Arhaan), मलायकाची आई व बहीण हेही यावेळी हजर होती. या लंच डेटमागचं खरं कारण आत्ता कुठे समोर आलंय. होय, मलायकाचा लाडका लेक अरहान घर सोडून नव्या प्रवासाला निघाला आहे. होय, अरहान शिक्षणासाठी मलायकापसून दूर जातोय. लेक आपल्याला सोडून दूर जातोय, या विचाराने कुठलीही आई भावुक होईल. मलायकाची स्थितीही वेगळी नाही. तिने अरहानसाठी एक इमोशनल पोस्ट लिहूनआपल्या या भावना व्यक्त केल्या आहे.
मलायका लिहिते, ‘आपण दोघेही एका अनोळखी प्रवासाला निघत आहोत... इथे भय आहे, उत्सुकता आहे आणि नवे अनुभवही आहेत. मला फक्त एवढं माहितीये, मला तुझा अभिमान आहे अरहान. पंख पसरून उंच झेप घेण्याची ही तुझी वेळ आहे. खूप मोठ्ठी झेप घे आणि स्वत:ची स्वप्न पूर्ण कर... मी तर आत्तापासूनच तुला मिस करू लागलीये...,’मलायकाने एअरपोर्टवरचा अरहानचा एक फोटोही शेअर केला आहे. यात तो त्यांच्या लाडका कुत्रा कॅस्परला मिठी मारताना दिसतोय. निरोप देणे खरंच खूप कठीण आहे..., असं हा फोटो शेअर करताना मलायकाने लिहिले आहे.
अरहान शिक्षणासाठी घरापासून दूर जात असल्यामुळेच रविवारी अरबाज व मलायका त्याच्यासोबत लंच डेटवर गेले होते. अरहान हा 18 वर्षांचा आहे. मलायका व अरबाजने 1998 मध्ये लग्न केले होते. दुस-याच वर्षी अरहानचा जन्म झाला होता. 2017 मध्ये अरबाज व मलायकाने घटस्फोट घेतला. मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करतेय तर अरबाज जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.