Join us

Malaika Arora : लोक ढोंगी आहेत...; मलायका अरोरा असं का म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 12:38 PM

Malaika Arora : मलायका अरोरा म्हणजे बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री. कपड्यांपासून वागण्याबोलण्यापर्यंत तिचं सगळंच बिनधास्त. मलायका तिच्या ड्रेसिंग स्टाईलसाठी ओळखली जाते.

Malaika Arora slams Trolls : मलायका अरोरा  (Malaika Arora) म्हणजे बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री. कपड्यांपासून वागण्याबोलण्यापर्यंत तिचं सगळंच बिनधास्त. मलायका तिच्या ड्रेसिंग स्टाईलसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर ती सतत स्वत:चे हॉट व बोल्ड फोटो शेअर करत असते. तिने हे फोटो शेअर केले रे केले की, काही जण तिला ट्रोल करायला सुरूवात करतात.  मलायका कधीही या ट्रोलर्सची पर्वा करत नाही. पण तिचे आईवडील कधी कधी यामुळे चिंतीत दिसतात. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत मलायका यावर बोलली.

हा कचरा आहे...माझे आईवडिल कधीकधी चिंतीत होतात. बेटा, तुझ्याबद्दल आज हे लिहून आलंय, याने असं म्हटलंय, त्याने अशी कमेंट केलीये, असं ते सुरुवातीला मला अनेकदा म्हणत. एक दिवस मी त्यांच्यासोबत बसले आणि तुम्ही हा सगळा कचरा वाचणं बंद करा. हा सगळा कचरा आहे आणि यावर स्वत:ची ऊर्जा वाया घालवू नका, असं मी त्यांना समजावलं.  ते काहीही ऐकतात आणि मग चिंता करायला लागतात. पण मी त्यांनी समजवल्यानंतर आता त्यांनाही चिंता करणं सोडलं आहे, असं मलायका म्हणाली.

लोक ढोंगी आहेत... लोक ढोंगी आहेत. हॉलिवूड अभिनेत्री रिहाना,जेनिफर लोपेज आणि बियॉन्स जे कपडे घालतात त्या कपड्यांचे लोक कौतुक करतात. पण तेच कपडे आपल्या इंडस्ट्रीतल्या लोकांनी घातले की लोक ट्रोल करतात. हा ढोंगीपणा आहे. दुटप्पीपणा आहे. लोकांनी ढोंगीपणा सोडून दिला पाहिजे. त्यांनी हॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणेच बॉलिवूडमधील अभिनेत्रींचे देखील कौतुक केलं पाहिजे, असंही मलायका म्हणाली.

मलायकाला अनेकदा तिच्या आणि अर्जुनच्या नात्यामुळे ट्रोल केलं जातं. मलायका ही 48 वयाची आहे तर अर्जुन 36 वर्षांचा आहे. अर्जुन हा मलायकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. वयात असणाºया अंतरामुळे अर्जुन आणि मलायकाला अनेक वेळा सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. 

टॅग्स :मलायका अरोरासोशल मीडिया