Join us

मलायका अरोरा सोशल मीडियावर झाली ट्रोल, काहींनी तिला म्हटले म्हातारी, वाचा काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 19:32 IST

मलायकाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. काहींनी तर तिला तू म्हातारी झाली आहेस असे सुनावले आहे.

ठळक मुद्देमलायकाला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. या आंटीने छैय्या छैय्या शिवाय बॉलिवूडमध्ये काय केले आहे अशी एकाने कमेंट केली आहे. अनेकांनी तर तिच्या फिगरमुळे तिला सुनावले आहे.

मलायका अरोरा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिचे ग्लॅमरस फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तसेच तिच्या खाजगी आयुष्यातील अनेक फोटो आपल्याला तिच्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतात. मलायका ही फिटनेसच्या बाबतीत प्रचंड सतर्क असून ती न चुकता दररोज जीमला जाते. एवढेच नव्हे तर तिचे व्यायाम, योगा करतानाचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. पण अशाच एका फोटोमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. काहींनी तर तिला तू म्हातारी झाली आहेस असे सुनावले आहे.

मलायकाने इन्स्टाग्रामवर नुकताच योगा करतानाचा तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. यासोबत तिने कॅप्शन लिहिले आहे की, माझ्याप्रमाणे हे योगासन करा... आणि द दिवा योगाला टॅग करत आणि मलायकाजमुव्हऑफदवीक हा हॅशटॅग टाकत तुमचा फोटो पोस्ट करा... या योगासनाला वृक्षासन असे म्हणतात. 

मलायकाने वृक्षासन कशाप्रकारे करतात हे देखील तिच्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. पण या पोस्टमुळे मलायकाला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. या आंटीने छैय्या छैय्या शिवाय बॉलिवूडमध्ये काय केले आहे अशी एकाने कमेंट केली आहे. अनेकांनी तर तिच्या फिगरमुळे तिला सुनावले आहे. तू आता प्रचंड बारीक दिसत आहेस असे काहींनी म्हटले आहे तर काहींनी तू म्हातारी झाली आहेस असे देखील कमेंटद्वारे मलायकाला सांगितले आहे. 

मलायका अरोरा सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या खाजगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. ती गेल्या काही महिन्यांपासून अर्जुन कपूरला डेट करतेय. दोघेही लवकरच लग्न करणार, असे मानले जात आहे. अर्थात अद्याप या लग्नाला मुहूर्त सापडलेला नाहीये. पण मलायका आणि अर्जुन बिनधास्त फिरताना दिसतात. अगदी खुल्लमखुल्ला रोमान्स करतानाचे त्यांचे फोटो पाहायला मिळतात. 

टॅग्स :मलायका अरोरा