उत्तम फिटनेस आणि बोल्डनेस यामुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा (malaika arora). आज तिला इंडस्ट्रीची फॅशन दिवाही म्हटलं जातं. त्यामुळे सोशल मीडियावर कायम तिच्या नावाची चर्चा असते. यात सध्या मलायका एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. मलायकाने नुकतंच तिचं वांद्र्यातील अपार्टमेंट भाडेतत्वावर दिलं आहे. विशेष म्हणजे या घरासाठी तिने कोटयवधींचं भाडं आकारल्याचं म्हटलं जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मलायकाने वांद्रा वेस्टमधील तिचं घर भाड्याने दिलं आहे. हे अपार्टमेंट तिने तीन वर्षांसाठी भाड्याने दिलं आहे. प्रसिद्ध कॉच्युम डिझायनर कशीश हंस यांनी ते भाड्याने घेतलं असून या अपार्टमेंटसाठी त्यांनी 1.57 कोटी रुपये मोजले आहेत.
'हिंदुस्तान टाइम्स'नुसार, मलायकाचं वांद्रा वेस्टमधील पाली हिल इथे एक आलिशान अपार्टमेंट आहे. प्रत्येक वर्षी भाड्याची रक्कम ५ टक्क्यांनी वाढणार आहे. त्यामुळे पहिल्या वर्षात मलायकाला या घराचं १.५ लाख रुपये भाड मिळणार आहे. त्यानंतर अनुक्रमे पुढील दोन वर्षांसाठी तिला १.५७ लाख आणि १.६५ लाख रुपये भाड मिळणार आहे.
दरम्यान, कशीश हंस यांनी ४.५ लाख रुपये डिपॉझिट भरलं आहे. विशेष म्हणजे मलायकाने हे घर पहिल्या भाडेतत्वावर दिलेलं नाही. यापूर्वी तिने जेफ गोल्डनबर्ग स्टुडिओचे मालिक जेफरी गोल्डबर्ग यांना भाड्याने दिलं होतं. त्यांच्याकडून ती १.२ लाख रुपये भाड आकारायची.