Join us

Malaika Arora : मलायका अरोरा अर्जुन कपुरसोबत लग्न करणार ? तिनेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 12:26 IST

मलायका अरोरा आणि अर्जुन कपुर बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. नुकतेच त्यांनी आपले नाते जगासमोर मान्यही केले.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपुर बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. नुकतेच त्यांनी आपले नाते जगासमोर मान्यही केले. आता ते खुलेआम बॉलिवुड पार्टी असो किंवा इतर इव्हेंट एकत्र दिसतात. त्यांचे मालदिव्ह्ज हॉलिडे चे फोटो सुद्धा खुप व्हायरल झाले होते. या जोडीला कायम ट्रोल केले जाते. मध्यंतरी मलायका प्रेग्नंट असल्याच्या अफवाही पसरल्या होत्या. यावर पडदा टाकत मलायका ने स्वत:च आपल्या वैयक्तिक आयुष्याचा खुलासा केला आहे. (Moving in with Malaika new show)

'मूव्हिंग इन विथ मलायका' हा मलायका चा नवीन शो आला आहे ज्यामध्ये ती वैयक्तिक आयुष्यावर बोलताना दिसणार आहे. शो च्या पहिल्या एपिसोडमध्ये दिग्दर्शिका फराह खानने हजेरी लावली. यात फराहने तिला विचारले की अर्जुन सोबतच्या नात्यावर जे बोलले जाते त्याला तु कशी सामोरी जाते. यावर मलायका म्हणाली, 'हे अजिबातच सोपे नाही. मी रोजच कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा सामना करते. तु तर त्याच्यापेक्षा मोठी आहेस. जेव्हा एक पुरुष स्वत:पेक्षा २० किंवा ३० वर्षांनी लहान मुलीला डेट करतो तेव्हा त्याचे कौतुक होते. जसा काय तोच जगाचा राजा. हेच महिला स्वत:पेक्षा लहान वयाच्या मुलासोबत असेल तर तिला कुगर किंवा आई मुलाची जोडी असे हिणवले जाते. हे रोजच बोलले जाते. यातल्या कित्येक गोष्टी तर मला माझ्या जवळच्या लोकांनीही ऐकवल्या आहेत. यामुळे मला जास्त दु:ख झाले.'

मलायका अर्जुनसोबत लग्न करणार ?

फराह खानने मलायका ला तिच्या भविष्यातील प्लॅनिंगविषयी, लग्न-मुलं याविषयी विचारले असता मलायका म्हणते, 'या फार काल्पनिक गोष्टी आहेत. स्वाभाविक आहे आम्ही या गोष्टींवर चर्चा केली. मी नेहमीच प्रत्येक नात्यात खुश राहिले आहे. आत्ता सुद्धा मी ज्याच्यासोबत आहे तो मला खुश ठेवतो. लोकं काय म्हणतात याचा मला काहीही फरक पडत नाही.'

Malaika Arora : 'त्या' घटनेनंतर मलायकाची दृष्टीच गेली, डोळे उघडले तेव्हा समोर होता..

फराह खानने सुद्धा स्वत:पेक्षा १० वर्ष लहान पुरुषासोबत लग्न केले आहे. तेव्हा तिला सुद्धा खुप गोष्टींंना सामोरे जावे लागले होते असे तिने  सांगितले. मलायका अरोरा च्या या नव्या शो ला मुलगा अरहान, बेस्ट फ्रेंड करिना कपुर खान आणि बॉयफ्रेंड अर्जुन कपुरने शुभेच्छा दिल्या आहेत.

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूरलग्न