Join us

मलायका अरोराचा लेक अरहान खान २१ वर्षांचा झाला, अभिनेत्री म्हणाली, 'माझी एकच साधी इच्छा...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 14:50 IST

अरहान खान हा मलायका आणि अरबाजचा एकुलता एक मुलगा आहे.

बॉलिवूडमधील फिटनेस आयकॉन मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या क्लासी लुक्समुळे नेहमीच चर्चेत असते. तसंच तिच्या वैयक्तिक आयुष्यावरही खूप गॉसिप होत असतात. मलायका आणि अरबाज खानचा घटस्फोट झाल्यानंतर दोघंही मुलगा अरहानसाठी एकत्र येतात. आज अरहान (Arhaan Khan) २१ वर्षांचा झाला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त मलायकाने खास पोस्ट लिहिली आहे. 

अरहान खान हा मलायका आणि अरबाजचा एकुलता एक मुलगा आहे. आज त्याच्या २१ व्या वाढदिवसानिमित्त मलायकाने त्याच्यासोबतचे अनेक क्युट फोटो शेअर केले आहेत. ती लिहिते,'माझा बेबी बॉय आज २१ वर्षांचा झाला. माझी तुझ्यासाठी साधी इच्छा आहे...तुला सुंदर आयुष्य मिळू दे, भरभरुन जग. हसत खिदळत आणि अगदी रडतही...जितकी मेहनत करशील तितकंच एन्जॉयही कर. प्रामाणिक राहा. तुला आवडणाऱ्या लोकांसाठी आणि गोष्टींसाठी वेळ काढ. छान झोप घे आणि स्वप्न पाहा. नेहमी तुझ्या चेहऱ्यावर ते हसू दिसू दे. तुझ्या नेहमीच्या जोक्सने आम्हाला हसवत राहा. आमचं तुझ्यावर प्रेम आहे हे तुला माहितच आहे.हॅपी बर्थडे गोड मुला. मला तुझा अभिमान आहे आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.'

मलायकाला २१ वर्षांचा मुलगा आहे यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. अरहान खान सध्या परदेशात शिक्षण घेतो. त्याचा अभिनय क्षेत्रात यायचा कोणताच विचार नसल्याचं त्याने सांगितलं होतं. मलायका आणि अरहान या मायलेकाचं एकमेकांशी खूपच क्लोज बाँडिंग आहे.

टॅग्स :मलायका अरोराअरबाज खानसोशल मीडियाबॉलिवूडपरिवार