Malaika Arora Share first Photo of Car Accident : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या (Malaika Arora) गाडीला सुमारे महिनाभरापूर्वी अपघात झाला होता. या अपघातात मलायका गंभीर जखमी झाली होती. खालापूर टोलनाक्यावर झालेल्या अपघातानंतर मलायकाला नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आताश: मलायका या अपघातातून सावरली आहे. कामावर परतली आहे. सोशल मीडियावर पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. अपघातानानंतर काही दिवसांनी या भयंकर अनुभवाबद्दल चाहत्यांना सांगितलं होतं. आता तिने आपला एक सेल्फी शेअर केला आहे. यात तिच्या चेहऱ्यावरच्या जखमेचे व्रण स्पष्ट दिसत आहे.
इन्स्टास्टोरीवर मलायकाने एक फोटो शेअर केला आहे. यात मलायका ज्यूस पिताना दिसतेय. तिने डोळ्यांवर गॉगल लावला आहे. याऊपरही डोळ्याच्या शेजारी तिला झालेल्या जखमेचा व्रण स्पष्ट दिसतोय. फोटोमध्ये तिच्या डोळ्याजवळची जखम बघता, मलायका थोडक्यात बचावली, अशी भावना चाहते व्यक्त करत आहेत.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर काही गाड्या एकमेकांना धडकल्या होत्या. या गाड्यांमध्ये मलायकाची कारही होती. गाडीला अपघात झाला तेव्हा मलायका गाडीत होती. सुदैवाने ती थोडक्यात बचावली. अपघातानंतर तिला लगेच नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं.या घटनेला आता तब्बल २६ दिवस लोटले आहेत. आता अभिनेत्री यातून सावरली आहे.
2 एप्रिल रोजी झालेल्या अपघातानंतर मलायकाने काही दिवस कामातून ब्रेक घेतला होता. पण आता दुखापतीतून सावरल्यानंतर ती पुन्हा कामावर परतली आहे. या अपघाताबद्दल अलीकडेच मलायका बोलली होती. तो दिवस खूप भयंकर होता. अपघात झाला त्याक्षणी जणू सगळं काही संपलं, असं मला वाटलं होतं. मी प्रचंड घाबरले होते, असं मलायका म्हणाली होती.