Join us

Malaika-Arjun : मलायका-अर्जुनच्या नात्यात पुन्हा दुरावा? अभिनेत्रीच्या पोस्टमुळे ब्रेकअपच्या चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2023 12:48 PM

काय चाललंय? मलायका-अर्जुनमध्ये पुन्हा बिनसलं, अभिनेत्रीच्या पोस्टमुळे ब्रेकअपच्या चर्चांना उधाण

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या अफवांमुळे चर्चेत आहेत. मलायकाने सोलो व्हॅकेशनचे फोटो शेअर केल्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण, त्यानंतर मलायकाच्या फोटोवर कमेंट करत अर्जूनने या चर्चांना पूर्णविराम दिला होता. आता पुन्हा त्यांच्यात बिनसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आणि याला मलायकाची इन्स्टाग्राम स्टोरी हे कारण ठरलं आहे. मलायकाने पुन्हा एकदा तिच्या इन्स्टावरुन क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.

“एक महिला तुम्ही तिला देत असलेल्या वागणूकीचं प्रतिबिंब असते. जर तुम्हाला तिचं वागणं खटकत असेल, तर तुम्ही तिला कशाप्रकारे वागणूक दिली आहे, त्याचा आधी विचार करा”, असं मलायकाने इन्स्टा स्टोरीमध्ये म्हटलं आहे. मलायकाने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने “भविष्याची काळजी घेणे म्हणजे तुमच्या वर्तमानातील गोष्टींची काळजी घेणे,” असं म्हटलं आहे. मलायकाच्या या पोस्टमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या या इन्स्टा स्टोरीने पुन्हा एकदा अर्जुन आणि तिच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जात आहे.

‘तारा सिंह’ची भूमिका ‘हा’ दाक्षिणात्य स्टार साकारू शकतो, ‘गदर २’च्या दिग्दर्शकाचं मोठं वक्तव्य

११ वर्षांनी लहान आणि विवाहित असलेल्या मलायकाबरोबरच्या रिलेशनशिपवरुन अर्जुनला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. अर्जुनने वेळोवेळी मलायकाबद्दलच्या नात्यावर भाष्य करत ट्रोलर्सला उत्तर दिलं होतं. अर्जुन आणि मलायका अनेकदा सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांच्या एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसायचे.

मलायकाने बॉलिवूड अभिनेता अरबाज खानशी १९९८ साली विवाह केला होता. सुखी संसाराच्या १९ वर्षांनी घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांना अरहान खान हा मुलगा आहे. मुलाच्या संगोपनासाठी घटस्फोटानंतरही अनेकदा मलायका आणि अरबाज एकत्र दिसतात.

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूरअरबाज खान