मलायका अरोरा इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर चांगलीच अॅक्टिव्ह असते. ते तिचे फोटो नेहमीच इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. पण तिने नुकत्याच शेअर केलेल्या एका फोटोमुळे तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल व्हायला लागले आहे.
मलायकाने दोन दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटला एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तिने लिहिले होते की, माझ्या मुडबद्दल केवळ माझ्या गर्लफ्रेंड्लाच माहीत असते. ती माझे प्रत्येक मुड कॅमेऱ्यात खूप छान प्रकारे कॅप्चर करते. त्याचसोबत तिने तिच्या मैत्रिणीला टॅग देखील केले होते. पण हे सगळे करताना मलायकाने एक चूक केली. मलायकाने या फोटो कॅप्शनसोबत मॅजिक लाइट, गर्ल्स गो देअर मुड्स, लव्ह माय गर्ल्स, कँडिड, नो मेकअप असे हॅशटॅग दिले आहेत. पण नो मेकअप या हॅशटॅगवरून तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे.
कारण या फोटोत तिने मेकअप केला असल्याचे आपल्याला फोटो पाहाताच लक्षात येत आहे. तिने डार्क लिपस्टिक लावली असून चेहऱ्याला देखील मेकअप केला आहे. यावरून सोशल मीडियाला तिला चांगलेच सुनावण्यात आले आहे. एका नेटिझन्सने लिहिले आहे की, एवढा मेकअप करून देखील नो मेकअपचा हॅशटॅग... हे खरं आहे की काय तर एकाने दोन किलोचा मेकअप करून देखील मेकअप केला नाही असा हॅशटॅग वापरत आहात असे सुनावले तर तर एकाने तुम्ही खरे बोलत आहात हा असा प्रश्न विचारला आहे.
मलायकाच्या या फोटोवर नेटिझन्सने तिला ट्रोल केले असले तरी अर्जुन कपूरने हम्म असे या फोटोवर कमेंट केले आहे. मलायका सध्या तिच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांना सध्या अनेक ठिकाणी एकत्र पाहायला मिळते. ते कधी डिनर डेटवर जातात तर कधी एकत्र चित्रपट पाहाताना दिसतात. अर्जुनच्या इंडियाज मोस्ट वाँटेड या चित्रपटाच्या प्रिमियरला देखील मलायका आवर्जुन उपस्थित राहिली होती. यावेळी पहिल्यांदाच दोघांनी मीडियासमोर एकत्र पोझ दिली होती.