Join us

Malaika Arora : 'त्या' घटनेनंतर मलायकाची दृष्टीच गेली, डोळे उघडले तेव्हा समोर होता..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 10:12 IST

मलायका अरोराचा नवीन शो 'मूविंग इन विथ मलायका' चर्चेत आहे. यात तिने अनेक वैयक्तिक गोष्टींचा खुलासा केला आहे.

Malaika Arora : सध्या सोशल मीडियावर मलायका अरोराचीच चर्चा आहे. तिचा जिम लुच, मॉर्निंग वॉक, पार्टी लुक प्रत्येक ठिकाणी मलायकाचीच जादू दिसते. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणखी जाणून घ्यायचे असेल तर मलायका नवीन शो घेऊन आली आहे. 'मूविंग इन विथ मलायका' असे या शो चे नाव आहे ज्यामध्ये ती पर्सनल लाईफविषयी पहिल्यांदाच खुलेपणाने बोलणार आहे.(Moving in with Malaika)

'मूविंग विथ मलायका शो' ची पहिली झलकच मलायकाच्या बिकिनी शुटने झाली आहे. यानंतर तिने आयुष्यातील सर्वात भयानक घटनेचा किस्सा सांगितला आहे. काही महिन्यांपुर्वी मलायका पुण्याहुन मुंबईकडे येत होती. तेव्हा तिचा अपघात झाला. यातच तिला गंभीर दुखापत झाली. या घटनेबद्दल सांगताना मलायका म्हणते, ' एका बससोबत माझ्या कारची धडक झाली. बस चालकाचे संतुलन बिघडले होते आणि बस आमच्या कार ला येऊन धडकली. माझ्या डोक्याला मार लागला. डोळ्यात काचेचे तुकडे गेले होते. रक्च वाहत होते. मला काही दिसणे बंद झाले. काही तासांसाठी माझी दृष्टी गेली.  मला वाटलं आता मी मेले. मी माझ्या मुलाला परत कधीच बघू शकणार नाही.'

डोळे उघडल्यावर समोर होता अरबाज खान

मलायका म्हणाली, ' मला रुग्णालयात दाखल केले गेले. सर्जरी झाली. सर्जरीतुन बाहेर आल्यावर मला सर्वात आधी कोण दिसले तर तो होता 'अरबाज'. त्याने मला विचारले, तुला काही दिसतंय का? डोळ्यासमोर हे किती बोटं आहेत, किती नंबर आहे असे तो विचारत होता. ही थोडी विचित्र भावना होती. काही वेळासाठी मला वाटले मी फ्लॅशबॅक मध्ये गेले आहे. मला सर्वात छान हे वाटले की आमच्यात काहीही घडलेले असो, कठीण काळी तो माझ्यासोबत होता हे महत्वाचे.'

२ एप्रिल रोजी मलायकाचा अपघात झाला होता. ती रेंज  रोव्हर गाडीत होती. आता पुन्हा गाडी चालवण्याचा आत्मविश्वास नाही असे तिने शो मध्ये सांगितले.

"मला ऑडिशन द्यायचंय...", जान्हवी कपूरनं दाक्षिणात्य सुपरस्टारला फोन करत मागितलं काम, पण...

पहिल्याच एपिसोडमध्ये दिग्दर्शिका फराह खान आली होती. फराह सोबत गप्पा मारतानाच तिने ही घटना सांगितली. मलायकाला या नवीन शोसाठी मुलगा अरहान, बेस्ट फ्रेंड करिना कपुर खान यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

टॅग्स :मलायका अरोराअपघातअरबाज खान