Join us

अर्जूनला सोडून कुणासोबत पॅरिसमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय मलायका, फोटो समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 16:11 IST

मलायका अरोरा ही पॅरिसमध्ये पोहचली आहे. 

बॉलिवूडची हॉट मॉडेल आणि अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. प्रोफेशनल लाइफपेक्षाही ती तिच्या पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत असते. सध्या मलायका आणि अर्जुन कपूरच्या (Arjun Kapoor) ब्रेकअपच्या चर्चा सुरू आहेत. राधिका-अनंत अंबानीच्या लग्नातही मलायका अरोरा ही अर्जून कपूरसोबत दिसली नाही. यामुळे या चर्चांनी अधिकच जोर पकडला आहे. यातचा आता मलायका अरोरा ही पॅरिसमध्ये (Malaika Arora in Paris) पोहचली आहे. 

मलायकाने काही सुपर हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मलायका अरोरा ही मलायका पॅरिसमध्ये धमाल करताना दिसत आहे. मलायका अर्जुनशिवाय पॅरिसमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. पॅरिसमध्ये मलायका कुणासोबत पोहचली आहे, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. दरम्यान, मलायका ही काही दिवसांपुर्वी स्पेनला गेली होती. तेव्हा स्पेन व्हॅकेशनचे काही फोटो तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केले होते. या फोटोमध्ये एका मिस्ट्री मॅनला स्पॉट करण्यात आलं होतं. त्यामुळेच मलायका पुन्हा प्रेमात पडली की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

गेल्या काही वर्षांपासून मलायका आणि अर्जुन कपूर एकमेकांना डेट करत होते. मलायका आणि अर्जुन लिव्ह इनमध्ये राहत असल्याचंही बोललं जात होतं. एकमेकांबरोबरचे फोटो पोस्ट करत ते प्रेम व्यक्त करतानाही दिसायचे. अनेक कार्यक्रमांना त्यांनी एकत्र हजेरीही लावली होती. पण, अनंत अंबानी राधिका मर्चंट यांच्या लग्नात मलायका कुठेच दिसली नाही. या शाही वेडिंग सोहळ्याला अर्जुन मात्र उपस्थित होता. शिवाय, एका इव्हेंटमध्ये अर्जुन आणि मलायका एकमेकांकडे दुर्लक्ष करताना दिसले होते. यावरुन त्यांचं ब्रेकअप झाल्याचं कन्फर्म झालं. 

टॅग्स :मलायका अरोरासेलिब्रिटीबॉलिवूडअर्जुन कपूरपॅरिस