सेलिब्रिटी मंडळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मग ते स्वतःविषयीचं एखादं कारण असो. मलायकला तसेच चर्चत राहण्यासाठी काही खास कारण लागत नाही. ती जे काही करत त्यावर तिच्या चाहत्यांची नजर असतेच आणि आपसुकच तिची चर्चा होते. तसेच छैय्या छैय्या गर्ल अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या अफेयरच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. दोघांनीही त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्यामुळे दोघेही लग्नबंधनात कधी अडकणार याकडचे नजरा लागल्या आहेत.
जीवनात आनंदी राहण्याची दुसरी संधी मिळाली असं समजावं असं सांगत मलायकाने अर्जुनसोबतच्या चांगल्या संबंधांची अप्रत्यक्ष कबुलीच दिली. त्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे” असं तिने सांगितले होते. तिकडे अरबाजनेही आपल्या जीवनातील काही गोष्टी उघड केल्या होत्या. जॉर्जियासोबत असलेल्या संबंधांची कबुली त्याने दिली होती.
तसंच मुलगा अरहानसह आपल्या नात्याबाबतही खुलासा केल्याचे त्याने म्हटले होते. आपल्या मुलांसह बराच वेळ घालवत असल्याचे त्याने सांगितले. बाप असल्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असल्याचेही त्याने स्पष्ट केले होते. दरम्यान अर्जून कपूरसह लग्नबंधनात अडकण्यापूर्वीच मलायका फॅमिली प्लॅनिंग करते. खुद्द मलायकानेच नॅशनल टीव्हीवर याविषयी कबुली दिली होती. तेव्हापासून मलायका प्रचंड चर्चेत आहे.
अलीकडेच मलायकाने 'सुपर डान्सर चॅप्टर 4' या रिएलिटी शोमध्ये तिची एक ईच्छा जगासमोर पहिल्यांदाच बोलून दाखवली होती. शोमध्ये मलायकाने मुलीची आई बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच मुलगी दत्तक घेणार असल्याचे तिने म्हटले होते. तिला नेहमीच मुलीची आई व्हायची ईच्छा असल्याचे तिने म्हटले होते. मलायका अरोरा 47 वर्षांची आहे आणि अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर ती अर्जुन कपूरला बर्याच दिवसांपासून डेट करत आहे.
सुपर डान्सरच्या मंचावरील स्पर्धक अंशिका राजपूतच्या डान्सने मलायकाला इतके प्रभावित केले की तिलाही आता तशीच मुलगी हवी आहे. मलायका म्हणाली की आता ती मुलीसाठी प्रयत्न करणार आहे. दुस-यांदा आई होण्याचा मलायका विचार करत आहे. मलायका आणि अरबाज खान यांना एक मुलगा आहे. एका मुलाची आई असूनही आता मलायकाला पुन्हा आई होण्यासाठी प्लॅनिंग करत असल्याचे तिने म्हटले आहे.मलायकाची ईच्छा ऐकून शोची जज गीता कपूरनेसुद्धा लवकरच तुझी ईच्छा पूर्ण होवो म्हणत मलायकाला शुभेच्छा दिल्या. यावर मलायकानेही 'गीता- तुझ्या तोंडात घी शक्कर म्हणत मी भविष्यात नक्की मुलगी दत्तक घेऊ शकते. ही माझी इच्छा आहे असे सांगितले.