मलायका अरोराचे (Malaika Arora) हिट बॉलिवूड नंबर्स कुणाला ठाऊक नाहीत? छैंया छैंया असो की मुन्नी बदनाम हुई या मलायकाच्या गाण्यांनी अक्षरश: धूम केली. आता काय तर मलायकाचे ‘मुन्नी बदनाम हुई’ (Munni Badnaam Hui) हे गाणे थेट अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. होय, इंग्लंडमध्ये डिपार्टमेंट फॉर एज्युकेशनने (डीएफई) सुरू केलेल्या नवीन संगीत अभ्यासक्रमाच्या गाण्यांच्या यादीमध्ये बॉलिवूडचे ‘मुन्नी बदनाम हुई’ हे चार्टबस्टर गाणे हे समाविष्ट करण्यात आले आहे. (Munni Badnaam Hui Finds a Place in England's New School Music Curriculum)
2010 मध्ये प्रदर्शित ‘दबंग’ (Dabangg) या चित्रपटातील हे तुफान लोकप्रिय आयटम सॉन्ग डीएफईच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्याची बातमी ऐकून मुन्नी अर्थात मलायका भलतीच सुखावली आहे. बातमीचे कटिंग शेअर करत, तिने याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
जगभरातील संगीतामधील विविधता समजून घेण्यासाठी डीएफई विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यासक्रम चालवते. या अगोदर किशोरी अमोणकर यांचे ‘सहेला रे’,अनुष्का शंकरचे ‘इंडियन समर’,ए.आर. रहमान यांचे ‘जय हो’ ही भारतीय गाणी या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेली आहेत. इंग्लंडच्या संगीत क्षेत्रातील शिक्षक, संगीतकार आणि अभ्यासकांच्या 15 जणांच्या पॅनलने मिळून हा अभ्यासक्रम तयार केला आहे.
डीएफईने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटल्यानुसार, ‘मुन्नी बदनाम हुई’ बॉलिवूडच्या चित्रपटातील आयटम नंबर्सपैकी एक आहे. अशा गाण्यांचा चित्रपटाच्या कथानकाशी थेट संबंध नसतो. पण या गाण्याचे चित्रकरण आकर्षक आहे आणि गाण्याच्या चालीत सांगितिक वैशिष्ट्य आहेत म्हणून त्याचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे. मुन्नी बदनाम हुई हे गाणे ममता शर्मा आणि ऐश्वर्या निगमने गायले आहे. गाण्याचे बोल ललित पंडित यांचे आहेत. मलायका या चित्रपटाची निमार्तीही होती. या गाण्यासाठी गायिका ममता शमार्ला बेस्ट फिमेल प्लेबॅक सिंगरचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. शिवाय गाण्याचे म्युझिक कंपोझर साजिद-वाजिद यांना बेस्ट म्युझिक डायरेक्टरचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. ‘मुन्नी बदनाम हुई’हे आयटम सॉन्ग त्या वर्षीचे सर्वाधिक लोकप्रिय गीत ठरले होते.