कोरोना लस घेतल्यानंतर ट्रोल करणाऱ्यांना मलायकानं दिले सडतोड उत्तर, वाचा काय म्हणाली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 12:16 PM2021-04-03T12:16:55+5:302021-04-03T12:22:43+5:30
Malaika Arora Takes Covid 19 Vaccine: मलायकाने नुकतेच कोरोना लस घेतली. लगेचच तिने लस घेतानाचा फोटो शेअर केला. फोटोला समर्पक अशी कॅप्शनही तिने दिली होती.
सध्या सर्वत्रच पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांना कोरोनाने घेरले होते.मलायकालाही गेल्यावर्षी करोनाची लागण झाली होती. ती होम क्वारंटाइन होती. योग्य उपचार घेऊन तिने करोनावर मात केली. आता ती पूर्णपणे बरी झाली आहे. योगा आणि नित्यनियमाने वर्कआऊट करत नेहमीच ती स्वतःला फिट ठेवते.
कलाकार सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची अपडेट ते शेअर करत असतात. त्यामुळे अनेक बॉलिवूड कलाकारांनी गेल्या काही दिवसांपासून कोरोना लस घेतल्यावर लगेचच त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.
मलायकाने नुकतेच कोरोना लस घेतली. लगेचच तिने लस घेतानाचा फोटो शेअर केला. फोटोला समर्पक अशी कॅप्शनही तिने दिली होती. कोरोना लस घेण्यासाठी दिलेल्या वयाच्या मर्यादेमध्ये माझं वय आहे असे तिने म्हटले आहे. मलायकाने फोटो शेअर करताना लिहीलेली कॅप्शनीही ट्रोलर्सची बोलती बंद करण्यासाठी असली तरी नेटीझन्स मात्र तिला वेगवेगळे प्रश्न विचारताना दिसले. पुन्हा एकदा तिच्या वयावरच प्रश्न केले आहेत.
मात्र मलाकाचा हा फोटो पाहून नेटीझन्सनाही मुद्दा मिळाला आणि त्यांनी लगेचच मलायकाला ट्रोल करायला सुरुवात केली. मलायकाला पहिल्यांदाच ट्रोल करण्यात आले आहे असे नाही.याआधीही तिला ट्रोल करण्यात आले आहे. त्यामुळे आता तिला ट्रोलिंगचा तसाही फारसा फरक पडत नाही.
आता मलायकाही ट्रोलर्सना तेव्हाच सडेतोड उत्तर देत त्यांची बोलती बंद करताना दिसते.मलायका या ना त्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय असते. नेहमीच नेटीझन्स तिला तिच्या ड्रेसिंग स्टाइलमुळे ट्रोल करत असतात.
मलायकाने अलीकडेच इन्स्टाग्राम स्टोरीजवर दोन मजेदार किस्से शेअर केले आहेत.यामध्ये तिने कोविड -19 ची लस घेतल्यानंतर घरी येणाऱ्या सर्व पाहुण्यांना काय बोलते ते सांगितले आहे. मलायकाने लिहिले, 'जेव्हा पाहुणे घरी यायचे, तेव्हा मी त्यांना म्हणायचे, घाबरू नका, आमच्या कुत्र्याचं लसीकरण केले आहे. आता मी त्यांना सांगतो, घाबरू नका, आम्हीसुद्धा व्हॅक्सिनेशन घेतलं आहे. '