Join us

ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान मलायका म्हणाली, 'प्रेमासाठी लढेन पण...'; अर्जुन कपूरला इशारा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 09:44 IST

मलायकाने प्रेम आणि सोशल मीडिया ट्रोलर्सवर एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.

मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हे बी टाऊनमधलं सर्वात चर्चेतलं कपल होतं. पण सध्या दोघांमध्ये बिनसलं असल्याची चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वी अर्जुनच्या वाढदिवसाला मलायका गायब होती. इतकंच नाही तर तिने सोशल मीडियावरही त्याला शुभेच्छा दिल्या नाहीत. उलट एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली होती. आता नुकतंच मलायकाने प्रेम आणि सोशल मीडियाट्रोलर्सवर एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.

'हॅलो मॅगजीन'शी बातचीत करताना मलायका म्हणाली, "सोशल मीडियावर खूपच टॉक्झिक ठिकाण आहे. म्हणूनच मी माझ्या भोवताली ढाल बनवली आहे. आता मी नकारात्मकता माझ्यापर्यंत येऊ देत नाही. मी यापासून स्वत:ला वेगळं केलं आहे. मग ते नकारात्मक लोक असो किंवा असं वातावरण, सोशल मीडिया असो किंवा ट्रोल्स. नकारात्मक ऊर्जा वाटली की मी स्वत:ला दूर नेते. हे मी काळानुसार शिकले आहे. आधी मला याचा फरक पडायचा. मला झोप यायची नाही. पण आता मला फरक पडत नाही असं मी सांगितलं तर खोटं वाटेल. मीही माणूस आहे त्यामुळे मी सुद्धा रडते,पडते, ट्रोल्सचा परिणाम होतो पण माझ्या या भावना तुम्ही सार्वजनिकरित्या पाहणार नाही."

ती पुढे म्हणाली, "मला सोशल मीडियावर कोणत्याही नेमलेस, फेसलेस व्यक्तीला उत्तर देण्याची गरज नाही. ट्रोलर्स माझ्यासाठी महत्वाचे नाहीत. मी प्रत्येक गोष्ट ओळखून आहे. पण मी स्वत:ला यापासून दूरच ठेवते."

प्रेमावर काय म्हणाली मलायका?

मलायका म्हणाली, "मी खूप रोमँटिक व्यक्ती आहे. काहीही होवो मी कधीच प्रेम करणं सोडणार नाही. याबाबतीत मी टिपिकल स्कॉर्पिओ आहे म्हणून मी प्रेमासाठी शेवटपर्यंत लढेन. पण मी वास्तवात जगते त्यामुळे मला माहित आहे की आयुष्यात कुठे रेष आखायची आहे."

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूररिलेशनशिपबॉलिवूडसोशल मीडियाट्रोल