अभिनेत्री मलायका अरोरा(Malaika Arora) ही सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. बॉलिवूडची फॅशन दिवा म्हणून तिला ओळखलं जातं. मलायका तिच्या अभिनयापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येते. तिचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आतादेखील मलायकाच्या एका फोटोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
नुकतंच मलायका अरोराने रेल्वेतून प्रवास केला आहे. याचा फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सध्या तिचा हा फोटो प्रचंड व्हायरल होतोय. या फोटोत ती रेल्वेच्या स्लीपर क्लास कोचमधून प्रवास करताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर फेस मास्क देखील दिसत आहे. तिने हा फोटो शेअर करताना #IndianRailways सोबत मेक इट पॉश, अस कॅप्शन लिहलं.
मलायकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती अलिकडेच 'येक नंबर' या मराठी गाण्यात दिसली होती. दरम्यान काही दिवसांपुर्वीच मलायका आणि अर्जुन कपूरचं ब्रेकअप झालं आहे. मलायकाव अर्जुनने २०१६ पासून एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. यापूर्वी मलायकाचा अरबाज खानपासून घटस्फोट झाला होता. त्यांना एक मुलगा आहे, त्याचे नाव अरहान असे आहे.