बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा(Malaika Arora)वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचे वडील अनिल मेहता यांनी आत्महत्या केली. ते राहत असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. एवढं मोठं पाऊल का उचललं असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. मृत्यूला कवटाळण्यापूर्वी अनिल मेहता यांनी त्यांच्या मुली मलायका आणि अमृता यांना फोन केला होता. जीवनाला कंटाळल्याचे त्यांना सांगितले. यानंतर त्यांनी आपला फोन बंद केला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांनी ११ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता जीवन संपवले. त्यांनी आपल्या मुलींना शेवटच्या वेळी बोलावले. अनिल मेहता यांनी आयेशा मनोर इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. शवविच्छेदन अहवालातही त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्याच्या डोक्याला जखमा होत्या. गुरुवारी पोलिसांनी मलायका, तिची बहीण अमृता आणि त्यांची आई जॉयस पॉलीकार्प यांचे जबाब नोंदवले.
अनिल मेहता यांनी मृत्यूपूर्वी केला होता त्यांचा फोन बंद मलायका आणि अमृताने आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितले की, त्यांचे वडील अनिल मेहता यांनी त्यांना फोन करून सांगितले होते की, 'मी आजारी आहे आणि थकलो आहे.' या फोननंतर कुटुंबीयांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपला फोन बंद केला होता. आता पोलिस डॉक्टर आणि कुटुंबीयांचे जबाबही नोंदवणार आहेत.
सलमान खान रात्री उशिरा पोहचला मलायकाच्या घरीअनिल मेहता यांच्या मृत्यूची बातमी समजताच मलायका अरोराचा माजी पती अरबाज खान घटनास्थळी पोहोचला. ही घटना घडली तेव्हा मलायका पुण्यात होती. त्यानंतर घरी पोहोचली. या कठीण काळात अर्जुन कपूर आणि खान कुटुंबही दिसले. १२ सप्टेंबरच्या रात्री सलमान खानही मलायकाच्या घरी पोहोचला.