Join us

उर्फीसारखी स्टाइल करणं मलायकाला पडलं भारी! बोल्ड फोटोशूटमुळे नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 12:06 PM

"द नेक्स्ट उर्फी", ब्रालेस टॉपमध्ये बोल्ड फोटोशूट केल्यामुळे मलायका अरोरा ट्रोल

बॉलिवूडची फॅशन आयकॉन अभिनेत्री मलायका अरोरा ऐन पन्नाशीतही तितकीच सुंदर दिसते. बोल्ड आणि ब्युटिफूल मलायका अनेकदा चाहत्यांना घायाळ करत असते. मलायका तिच्या फिटनेसकडेही विशेष लक्ष देताना दिसते. तिचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मलायकाला अनेकदा ट्रोलही केलं जातं. आताही मलायका नव्या फोटोशूटमुळे ट्रोल झाली आहे. 

मलायका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. फोटोशूटचे फोटोही मलायका शेअर करताना दिसते. नुकतंच मलायकाने ब्रालेस बोल्ड फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत. पण, या फोटोमधील मलायकाचा लूक चाहत्यांच्या पसंतीस न उतरल्याचं चित्र आहे. मलायकाने फोटोत हिरव्या रंगाचा टॉप आणि आरसे असलेला स्कर्ट परिधान केला आहे. मलायकाचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करत तिची तुलना अतरंगी कपडे घालणाऱ्या उर्फी जावेदशी केली आहे. 

मलायकाच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करत "उर्फी जावेद लाइट" असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "उर्फी तर उगाचच बदनाम आहे. ही तरी कुठे पूर्ण कपडे घालते," अशी कमेंट केली आहे. "द नेक्स्ट उर्फी", अशी कमेंटही एकाने केली आहे. एका नेटकऱ्याने "महागातली उर्फी" असं म्हटलं आहे. 

मलायकाने अनेक बॉलिवूड चित्रपटांत आयटम साँग्स केले आहेत. वैयक्तिक आयुष्यामुळेही ती चर्चेत असते. मलायकाने १९९८ साली अरबाज खानबरोबर लग्न केलं होतं. २०१७मध्ये घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांना एक मुलगा आहे. अरबाजबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर आता मलायका अर्जुन कपूरबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे.

टॅग्स :मलायका अरोरासेलिब्रिटी