बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजात दिसते. या वयातही ती स्वत:ला फीट ठेवण्यासाठी योगा क्लास आणि जिमला जात असते. तर पापाराजी हे योगा क्लास आणि जिमबाहेर तिची वाट बघत बसलेले असतात.
मलायका स्वत:ही सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव असते आणि फॅन्ससाठी तिचे खास फोटोज किंवा व्हिडीओ शेअर करत असते. फॅन्स पेज्सवर पापाराजी तिचे बोल्ड फोटो शेअर करत असतात. नुकतीच मलायका अरोरा फारच बोल़्ड अंदाजात दिसली होती. तिचे हे फोटो शेअर केले जात आहेत. या फोटोतील कपड्यांमुळे ती ट्रोलही होत आहे.
या फोटोंमध्ये मलायका अरोरा फारच शॉर्ट कपड्यांमध्ये दिसत आहे. ती यात छोट्या शॉर्ट्स आणि क्रॉप टॉपमध्ये दिसत आहे. याच कपड्यांमध्ये ती तिच्या योगा क्लासच्य बाहेर दिसून आली. फॅन्सने तिला कपड्यांवरून ट्रोल केलं आहे.
एका यूजरने ट्रोल करत लिहिलं की, 'इतकंच कशाला घातलं आहे?'. तेच एका दुसऱ्या यूजरने लिहिलं की, 'इतकी गरीब झाली आहे का?'. अशात मलायका कपड्यांवरून ट्रोल होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही ती अनेकदा ट्रोल झाली आहे. पण तिला कोण काय म्हणतं याने फरक पडत नाही.