वयाची पंचेचाळिशी ओलांडलेल्या मलायका अरोराचा (Malaika Arora ) फॅशन सेन्स व स्टाईल जबरदस्त आहे. अख्खी दुनिया तिच्या फॅशन सेन्सची ‘दिवानी’ आहे. पण कदाचित मलायकाच्या स्वत:च्या मुलालाच आईचा ड्रेसिंग सेन्स आवडत नाही. म्हणूनच तर त्याने चक्क शोमध्ये तिच्या ड्रेसिंग सेन्सची खिल्ली उडवली.मलायकाचा मुलगा अरहान (Arhaan) याने नुकतीच आईच्या ‘मूव्हींग इन विथ मलायका’ या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तो आईच्या स्टायलिश कपड्यांची खिल्ली उडवताना दिसला.
‘मूव्हींग इन विथ मलायका’च्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये मलायकाने ग्लॅमरस टॉप परिधान केला होता. मात्र याच टॉपवरून अरहानने तिची खिल्ली उडवली. मलायकाच्या स्टायलिश व सेक्सी टॉपची तुलना अरहानने टेबल नॅपकिनशी केली. ‘तू जेलमधल्या कैदीसारखी दिसतेयस...’, असं तो म्हणाला. हे ऐकून काय बोलावं आणि काय नको, हेच मलायकाला कळेना. तिने त्यावर काहीही रिअॅक्ट केलं नाही. ती केवळ हसली.
अमृता माझी दुसरी आई...याच शोमध्ये अरहानने मावशी अमृता अरोरासोबतच्या नात्याबद्दलही वक्तव्य केलं. ‘मी अमूच्या (अमृता अरोरा) बाजूने आहे. कारण ती तुझी (मलायका) जागा घेण्यासाठी स्वत: खूप प्रयत्न करत असते. माझ्यासाठी ती दुसºया आईसारखीच आहे. मात्र आता मला असं वाटतंय की ती पहिल्या स्थानावर येतेय..., असं अरहान म्हणाला.अरहानचं मावशी अमृतासोबत खूप चांगलं बॉन्डिंग आहे. मलायका आणि अमृता या दोन्ही बहिणींमध्येही खूप मैत्रीपूर्ण नातं आहे. मलायकाच्या प्रत्येक चढउतारांमध्ये तिने साथ दिली.
मलायकाने 2017 मध्ये अरबाज खानला घटस्फोट दिला. या दोघांना 20 वर्षांचा अरहान हा मुलगा आहे. विभक्त झाल्यानंतरही मुलासाठी या दोघांना नेहमीच एकत्र आल्याचं पाहिलं गेलं. अरहान अमेरिकेत फिल्म मेकिंगचं शिक्षण घेतोय. अरहान आपल्या किलर लुक्समुळे नेहमीच चर्चेत असतो. सध्या तो भारतात आला आहे. विमानतळावर त्याला सोडायला जाताना किंवा तो परतल्यावर त्याला आणायला जाताना नेहमीच मलायका आणि अरबाजला एकत्र दिसतात.