बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. कधी तिच्या पर्सनल लाइफमुळे तर कधी तिच्या फिटनेस आणि फॅशन सेन्समुळे. यात अनेकदा मलायकाला तिच्या कपड्यांमुळे ट्रोलही व्हावं लागलं आहे. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा तिच्या बाबतीत घडला आहे. सध्या सोशल मीडियावर मलायकाचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तिने ओव्हर साईज शर्ट परिधान केल्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
मलायका कायमच तिच्या फॅशनसेन्सकडे लक्ष देत असते. त्यामुळे ती अनेकदा नवनवीन फॅशन कॅरी करताना दिसते. यात बऱ्याचदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. मात्र, ट्रोलर्सकडे ती कायमच दुर्लक्ष करते आणि तिची फॅशन कॅरी करते. परंतु, यावेळी ती पुन्हा ट्रोल झाली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मलायकाने एक ओव्हर साइज व्हाइट शर्ट घातला आहे आणि त्यावर क्रीम कलरचं ओव्हर साइज वुलनचा स्वेटरही. परंतु, तिचा हा लूक पाहिल्यावर तुम्ही पँट घालायची विसरलात असं म्हणत नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली.
'असं वाटतंय त्या काही तरी घालायचं विसरुन गेल्या आहेत. स्टाइल अपूर्ण झाल्यासारखी वाटते', असं एका नेटकऱ्याने म्हटलं. तर, 'अजब लोगों की गजब दुनिया',असंही एका नेटकऱ्याने म्हटलं. तसंच' घाई गडबडीत पँट घालायची विसरलीस ताई',अशी कमेंट एका युजरने केली आहे.
दरम्यान, मलायकाची कपड्यांवरुन किंवा चालण्याच्या पद्धतीवरुन ट्रोल होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा ती ट्रोल झाली आहे. सध्या मलायका तिच्या पर्सनल लाइफमुळे जास्त चर्चेत येते. गेल्या काही काळापासून ती अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. त्यामुळे ही जोडी कायम चर्चेत असते.