मलायका अरोरा (Malaika Arora) किती स्टायलिश आहे, हे तिच्या फोटोंवरून कळतंच. मलायकाने कधीच वयाची चाळीशी ओलांडलीये. पण फॅशनच्या बाबतीत ती बड्या बड्या तरूण अभिनेत्रींना टक्कर देते. अर्थात अनेकदा याच फॅशनमुळे ती ट्रोलही होते. पण ट्रोलिंगची पर्वा करेल ती मलायका कुठली? आता हेच बघा, पँट न घालता फक्त ओव्हर साइज शर्ट घालून मलायका बाहेर पडली आणि ट्रोल झाली.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने मलायकाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या मलायकाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. काहींना तिचा हा अंदाज आवडला आहे. पण अनेकांनी यावरून तिची खिल्ली उडवली आहे. ओव्हर साइज व्हाईट शर्ट, त्यावर ब्लॅक बूट, साईड पर्स अशा अवतारात मलायका डिनर डेटसाठी बाहेर पडली. मग काय, लोकांनी नेहमीप्रमाणे तिला ट्रोल केलं.
‘बिचारी पँट घालायला विसरली’, असं एका युजरने लिहिलं. अर्जुनचा शर्ट आहे का? असा सवाल एका युजरने तिला केला. ‘ये क्या अर्जुन की शर्ट पहने के आ गई बावली,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. कुछ भी, हद हो गई यार, अशी कमेंट अन्य एका युजरने केली.
मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करतेय. सध्या अर्जुन युकेमध्ये आपल्या एका चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. पण तिथेही त्याला मलायकाची आठवण सतावते आहे. मलायकाचा एक थ्रोबॅक फोटो त्याने शेअर केला आहे. या फोटोत दोघांनी एकसारखा ब्ल्यू फ्रेमचा गॉगल घातला आहे. कोणाला जास्त शोभून दिसतोय? असा प्रश्न त्याने आपल्या पोस्टमध्ये केला आहे आणि स्वत:चं याचं उत्तर देत त्याने मलायकाचा फोटो शेअर केला आहे.
नुकतीच मलायकाने फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात होस्ट मनिष पॉलने मलायकाची चालण्याच्या स्टाइलवरुन खिल्ली उडवली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.