Join us

अरेरे, किती ही गरीबी! मलायका अरोराची ‘स्टाईल’ बघून लोकांनी घेतली मजा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 11:13 AM

लोकांना मलायकाची स्टाईल स्टेटमेंट आवडते आणि मलायकाही आपल्या मूडनुसार, स्टाईलबाबत कायम नवे प्रयोग करते. अलीकडेही तिने असाच काही एक प्रयोग केला. पण तिचा हा प्रयोग पुरता फसला.

ठळक मुद्देएका ट्रोलरने तर मलायकाची ‘फाटलेली जीन्स’ पाहून तिची चांगलीच खिल्ली उडवली. एकाने तर चक्क मलायकासाठी स्टाईलिस्टची मदत मागितली.‘कुणी स्टाईलिस्ट हिची मदत करेल का?’, असे त्याने लिहिले.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही कायम फिटनेस आणि तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. लोकांना मलायकाची स्टाईल स्टेटमेंट आवडते आणि मलायकाही आपल्या मूडनुसार, स्टाईलबाबत कायम नवे प्रयोग करते. अलीकडेही तिने असाच काही एक प्रयोग केला. पण तिचा हा प्रयोग पुरता फसला. होय, कालपरवा मलायका टॉर्न जीन्स आणि टॉपमध्ये मुंबईच्या रस्त्यांवर दिसली. पण तिचा हा अंदाज लोकांना जराही आवडला नाही. मग काय, मलायकाला लोकांनी चांगलेच ट्रोल केले.

एका ट्रोलरने तर मलायकाची ‘फाटलेली जीन्स’ पाहून तिची चांगलीच खिल्ली उडवली. भारतात गरीबी किती वाढलीय, असे हा ट्रोलर म्हणाला.

एकाने मलायकाच्या या स्टाईलला ‘डोळ्यांत खुपणारा काटा’ संबोधले.

एकाने तर चक्क मलायकासाठी स्टाईलिस्टची मदत मागितली.‘कुणी स्टाईलिस्ट हिची मदत करेल का?’, असे त्याने लिहिले. अनेक ट्रोलर्सनी मलायकाला ट्रोल करताना अर्जुन कपूरवरही निशाना साधला.

‘ती अर्जुन कपूरच्या वयानुसार स्टाईल करण्याचा प्रयत्न करतेय,’ असे एका ट्रोलरने लिहिले.अर्थात बिनधास्त मलायकाला यामुळे जराही फरक पडला नाही, ना पडणार. तूर्तास मलायका व अर्जुन कपूर या दोघांच्या अफेअरची चर्चा जोरात आहेत. येत्या एप्रिलमध्ये दोघेही लग्न करणार, असे मानले जात आहे. मात्र मलायका व अर्जुन दोघेही यावर चुप्पी साधून आहेत. कालपरवाचं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मलायकाने अर्जुन व तिच्या लग्नांच्या बातम्या फेटाळून लावल्या होत्या. मी माझ्या पर्सनल आयुष्याविषयी काहीही बोलणार नाही.माझ्या आयुष्यात काय चालू आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. मी मात्र त्यावर बोलणार नाही, असे ती म्हणाली होती. नुकतेच ‘कॉफी विद करण 6’मध्ये करण जोहरने मलायका व अर्जुन लवकरच लग्न करणार असल्याचे संकेत त्याने दिले होते. करणचे हे शब्द ऐकून मलायका चांगलीच लाजली होती. ‘प्लीज रूको, अभी रूको,’असे म्हणत मलायकाने करणला शांत करण्याचा प्रयत्न केला होता. अर्जुन कपूर हा मलायकापेक्षा १० वर्षांनी लहान आहे.

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर