बॉलिवूड अभिनेता अरबाज खान सोबत विभक्त झाल्यानंतर अभिनेत्री मलायका अरोरा नेहमी तिच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत येत असते. अर्जुन कपूरसोबतचे तिचे फोटो आणि व्हिडीओ बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. ते दोघेही बऱ्याचदा एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत असतात. मात्र घटस्फोटाआधी अरबाज आणि मलायकाकडे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल म्हणून पाहिले जात होते. त्यांच्या घटस्फोटाच्या वृत्ताने चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता.
अरबाज खान आणि मलायका अरोराने २०१७ साली वेगळे होण्याचा निर्णय घेतला. ते वेगळे का झाले, याबद्दल त्यांनी कधी सांगितले नाही. मात्र त्यांच्यातील मतभेदांबद्दल बऱ्याचदा सांगितले. एकदा मलायका अरोराने शोमध्ये सर्वांसमोर म्हटले होते की, ती अरबाजच्या एका सवयीमुळे त्रस्त झाली आहे आणि त्याची ही सवय दिवसेंदिवस जास्त बिघडत जाते आहे.
अरबाजची ही गोष्ट आवडत होती मलायकालाफराह खानचा भाऊ साजिद खानला मलायका अरोरा आणि अरबाज खानने मुलाखत दिली होती. त्यावेळी त्या दोघांनी एकमेकांचे खूप कौतुक केले होते आणि वाईट गोष्टीदेखील सांगितल्या होत्या. साजिद खानने मलायकाला त्यावेळी विचारले होते की, अरबाजची अशी कोणती गोष्ट तुला जास्त भावते आणि कोणती गोष्ट आवडत नाही. त्यावर मलायका म्हणाली की, सर्वात जास्त त्याची प्रेम करण्याची पद्धत मला आवडते. हे कधीच प्रेम व्यक्त करत नाही, पण समजू शकते. म्हणूनच आमचे बॉण्डिंग चांगले आहे. ते मला ज्या पद्धतीने खूश ठेवतात आणि नेहमी हसवितात. ही गोष्ट सर्वात भावते.
अरबाजच्या या सवयीला कंटाळली होती मलायकामलायका पुढे म्हणाली की, जर वाईट सवयीबद्दल सांगायचे तर ते खूप बेफिकिर आहेत आणि ही गोष्ट दिवसेंदिवस वाढते आहे. तर अरबाजने याच प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले की, मलायका बऱ्याच गोष्टी खूप चांगल्या मॅनेज करते. मलायका कधीच तिची चूक मान्य करत नाही. ही गोष्ट मला खूप खटकते.