Join us

मलायका अरोराच्या इमारतीतही कोरोना रूग्ण, बिल्डींग सील

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 10:47 AM

कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत तर कोरोनाने थैमान घातले आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा राहत असलेल्या इमारतीतही कोरोना पोहोचला आहे. 

ठळक मुद्देमलायका व अर्जुन कपूर दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. हे जोडपे लवकरच लग्न करणार असल्याचे मानले जात आहे.   

कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत तर कोरोनाने थैमान घातले आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा राहत असलेल्या इमारतीतही कोरोना पोहोचला आहे. मलायकाच्या इमारतीत कोरोना रूग्ण आढळल्यानंतर ही इमारत सील करण्यात आली आहे.मलायका वांद्रयातील टस्कनी अपार्टमेंटमध्ये राहते. याच इमारतीत कोरोना रूग्ण आढळला. यानंतर हा संपूर्ण परिसर कंटेन्टमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला. कंटेन्टमेंट झोनच्या बॅनरसह इमारतीचा फोटोही समोर आला आहे. लॉकडाऊनकाळात या इमारतीत मलायका तिच्या मुलासोबत राहतेय.

लॉकडाऊनमुळे मलायका अरोरा गेल्या अनेक दिवसांपासून घरात कैद आहे. पण म्हणून तिची चर्चा होणार नाही, असे थोडीच़ सोशल मीडियाद्वारे मलायका सतत चाहत्यांच्या संपर्कात आहे. तेवढीच चर्चेतही आहे. कधी ती कुकिंग करतानाचे व्हिडीओ पोस्ट करते. कधी घरात ब्युटी ट्रिटमेंट  घेतानाचे फोटो शेअर करते.

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत मलायका अर्जुन कपूरसोबतचे तिचे नाते आणि अरबाज खानसोबतचा घटस्फोट यावर बोलली होती.‘प्रत्येकाला जीवनात जोडीदार हवा असतो़ त्यावेळी अरबाजसह काडीमोड घेऊ नये, असे मला अनेकांनी सुचवले होते. मात्र काडीमोड घेण्याचा आपला निर्णय झाला होता आणि या निर्णयामुळे खूश आहे. जे काही झाले ते चांगलेच झाले. 

भूतकाळं विसरून जीवनात पुढे जाताना एक चांगला मित्र व जोडीदार मिळाला तर तुम्ही नशीबवान असता. जीवनात आनंदी राहण्याची दुसरी संधी मिळाली, असे तुम्ही समजू शकता,’ असे ती म्हणाली होती.मलायका व अर्जुन कपूर दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. हे जोडपे लवकरच लग्न करणार असल्याचे मानले जात आहे.  

टॅग्स :मलायका अरोराकोरोना वायरस बातम्या