Malaika Arora Father Death: अभिनेत्री मलायका अरोरा(Malaika Arora )वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या वडील अनिल अरोरा यांचे निधन झाले आहे. त्यांनी सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे समजते आहे.
अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी बुधवारी सकाळी आत्महत्या केली. ही घटना सकाळी ९ वाजता घडली. अनिल यांनी वांद्रे येथील घरातून सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यामागचं कारण अद्याप समजू शकलेले नाही. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मलायकाचा एक्स पती अरबाज खान कुटुंबासह घटनास्थळी पोहोचला आहे. मलायकाला तिच्या वडिलांच्या निधनाची बातमी मिळाली तेव्हा ती पुण्यात होती. माहिती मिळताच ती तात्काळ मुंबईला रवाना झाली आहे.
मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांचा जन्म पंजाबमधील फजिल्का जिल्ह्यात झाला आहे. पंजाबी कुटुंबातील अनिल मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी होते. त्यांनी मल्याळम ख्रिश्चन धर्मातील जॉयस पॉलीकार्प यांच्याशी लग्न केले. त्यांना मलायका आणि अमृता या दोन मुली आहेत. त्यांच्या आत्महत्येमुळे अरोरा कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
मलायका अरोराच्या वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?मलायका अरोराचे वडील अनिल यांनी आत्महत्या का केली असेल, असा प्रश्न सर्वांना पडला आहेसध्या पोलीस या प्रकरणाचा पूर्ण तपास करत आहेत.
गेल्या वर्षी रुग्णालयात झाले होते दाखल
अनिल अरोरा यांना जुलै २०२३ मध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील वर्षी अनिल अरोरा यांना तब्येत बिघडल्यामुळे मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.