Join us  

"इंटिमेट सीन शूट करताना मला...", सिद्धांतसोबत 'युध्रा' मध्ये दिसणाऱ्या मालविकाने सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 4:47 PM

इंटिमेट सीन्स करणं आणि कंफर्टेबल राहणं हे सोपं नसतं.

अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीचा (Siddhant Chaturvedi) आगामी 'युध्रा' सिनेमा रिलीज होत आहे. यामध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री मालविका मोहननसोबत (Malavika Mohanan) त्याची जोडी जमली आहे. मालविका आणि सिद्धांतचं एक गाणंही प्रदर्शित झालं आहे ज्यामध्ये दोघांची हॉट अँड सिझलिंग केमिस्ट्री दिसत आहे. बीचवर आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यात शूट झालेल्या या गाण्यात दोघांनी इंटिमेट सीन्स दिले आहेत. हे गाणं शूट करतानाचा अनुभव मालविकाने शेअर केला आहे.

न्यूज १८ शी बातचीत करताना मालविका मोहनन म्हणाली, "इंटिमेट सीन्स करणं आणि कंफर्टेबल राहणं हे सोपं नसतं. पण आता सेटवर इंटिमसी कोऑर्डिनेटर असतात ही खूप चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाला मर्यादा माहित असणं गरजेचं असतं. इंटिमसी शूट करण्याची प्रक्रिया सोपी नसते पण कोऑर्डिनेटर्स ते सोपं करतात. गाण्याचं शूट करताना इंटिमसीपेक्षा जास्त आम्ही थंडीमुळे हैराण होतो. गाण्यात आम्हाला इंटिमेट सीन्स आणि किसींग सीनही द्यायचा होता. समुद्राच्या लाटा येत होत्या आणि आम्ही पूर्ण भिजलो होतो. त्यामुळे खूप जास्त थंडी वाजत होती. त्यामुळे किसींगबद्दल आम्ही फार विचारच करत नव्हतो."

'युध्रा' २० सप्टेंबरला रिलीज होणार आहे. यामध्ये राघव जुयाल खलनायकाच्या भूमिकेत आहे. राघव आणि सिद्धांतमध्ये जबरदस्त अॅक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत. नुकत्याच रिलीज झालेल्या 'किल' मधून राघवने सर्वांनाच प्रभावित केलं. आता 'युध्रा' मधील त्याच्या परफॉर्मन्सकडे लक्ष लागलं आहे.

टॅग्स :सिद्धांत चतुर्वेदीबॉलिवूडसिनेमा