Join us  

​मल्याळम अभिनेते जिष्णु राघवन यांची अकाली ‘एक्झिट’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2016 11:23 PM

प्रसिद्ध अभिनेते राघवन यांचे पुत्र आणि मल्याळम अभिनेते जिष्णु राघवन यांनी उण्यापुºया ३५ व्या वर्षी घेतलेली ‘एक्झिट’ सर्वांनाच चटका ...

प्रसिद्ध अभिनेते राघवन यांचे पुत्र आणि मल्याळम अभिनेते जिष्णु राघवन यांनी उण्यापुºया ३५ व्या वर्षी घेतलेली ‘एक्झिट’ सर्वांनाच चटका लावून गेली. आज शुक्रवारी एका खासगी रूग्णालयात जिष्णु यांचे कर्करोगाने निधन झाले.  जिष्णु यांना घशाच्या आणि फु फ्फुसाच्या कर्करोगाने ग्रासले होते. उपचारादरम्यान सकाळी सव्वा आठच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १९८७ मध्ये ‘किलिपट’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून जिष्णु यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली. यानंतर २००२ मध्ये कमल दिग्दर्शित ‘नम्मल’ या चित्रपटात ते दिसले. याशिवाय ‘चूंडा’, ‘फ्रिडम’, ‘परयरम’ यासारख्या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या. पेशाने अभियंता असलेल्या जिष्णु यांनी चित्रपटांतून ब्रेक घेत, ग्रामीण भागांतील माहिती तंत्रज्ञानासाठी काम केले. यानंतर ते पुन्हा अभिनयाकडे वळले होते. यादरम्यान त्यांनी ‘आर्डिनरी’, ‘निद्रा’,‘उस्ताद हॉटेल’ अशा अनेक मल्याळम चित्रपटांतून काम केले.