मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर त्यांच्या नात्यामुळे बॉलिवूडमधील चर्चेतील कपल राहिलं आहे. त्यांच्या वयातील अंतरामुळे त्यांना ट्रोलही करण्यात आलं होतं. पण, मलायका आणि अर्जुनने वेळोवेळी त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे भाष्य करत ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं होतं. पण, आता अर्जुन-मलायकामध्ये बिनसल्याच्या चर्चा आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यांच्या नात्यात दुरावा आला असून आता ते एकमेकांपासून वेगळे होणार असल्याचं वृत्त आहे. अशातच आता अर्जुन कपूरच्या पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे.
मलायका अरोराबरोबर ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अर्जुन कपूरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. “या जगात फक्त एकाच गोष्टीवर विश्वास ठेवू शकतो, ती म्हणजे कचरा” असं अर्जुन त्याच्या स्टोरीमध्ये म्हटलं आहे. त्याच्या या इन्स्टास्टोरीनंतर मलायकाबरोबरच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण, याबाबत दोघांकडूनही कोणतीही प्रतिक्रिया अजून समोर आलेली नाही.
Dream Girl 2 : आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल’ची कमाल, पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी
अर्जुन कपूर आणि मलायका अनेकदा एकमेकांबरोबर सोशल मीडियावर फोटो शेअर करत एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करताना दिसायचे. अनेकदा मुलाखतीतूनही त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे भाष्य केलं होतं. मलायकाने तिच्या सोलो व्हॅकेशनचे फोटो शेअर केल्यापासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पण, आता तिने अर्जुनच्या कुटुंबीयांनाही अनफॉलो केलं आहे. त्यामुळे या चर्चांना उधाण आलं आहे.
'सुभेदार' ठरला वरचढ! IMDB रेटिंगमध्ये अजय देवगणच्या 'तान्हाजी'ला टाकलं मागे
दरम्यान, अर्जुन कपूरचं नाव सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री कुशा कपिलाबरोबर जोडलं जात आहे. ते दोघेही डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. यावर कुशा कपिलाने मौन सोडत प्रतिक्रिया दिली होती. अर्जुन कपूरला डेट करत असल्याच्या वृत्तांवर टिप्पणी करताना ती म्हणाली, “माझ्याबद्दल इतकं बकवास रोज वाचल्यानंतर, मला स्वतःचा एक फॉर्मेट परिचय करून द्यावा लागेल. मी नेहमीच माझ्याबद्दल मूर्ख गोष्टी पाहते. मी फक्त प्रार्थना करतो की माझ्या आईने हे सर्व वाचू नये. तिच्या सोशल लाइफला धक्का बसेल.”