काय सांगता? मल्लिका शेरावतने 11 वर्षांपूर्वीच कमला हॅरीस यांच्याबद्दल केली होती भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 01:37 PM2020-11-09T13:37:11+5:302020-11-09T13:40:13+5:30
होय, मल्लिकाची एक भविष्यवाणी ब-याच अंशी ठरली आहे.
बॉलिवूडची ‘मर्डर गर्ल’ मल्लिका शेरावतने केलेली भविष्यवाणी खरी ठरते, असे कोणी सांगितले तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. होय, मल्लिकाची एक भविष्यवाणी ब-याच अंशी ठरली आहे. 11 वर्षांपूर्वी केलेले तिचे एक ट्विट सध्या तुफान व्हायरल होतेय. याच ट्विटमध्ये तिने एक मोठी भविष्यवाणी केली होती. होय, कमला हॅरीस यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी 2009 साली तिने एक भाकित वर्तवले होते. आज 2020 मध्ये तिने वर्तवलेले हे भाकित काही अंशी खरे ठरले आहे.
अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांनी दणदणीत विजय मिळवला. सध्या त्यांच्या या विजयाने भारतात आनंद व्यक्त केल्या जात आहे. याचदरम्यान मलिक्का शेरावतचे ट्विटही चर्चेत आले आहे.
Having fun at a fancy event with a woman who they say could be US President, Kamala Harris. Chicks rule!
— Mallika Sherawat (@mallikasherawat) June 23, 2009
‘एका धम्माल पार्टीमध्ये एक महिलेसोबत मज्जा करतेय. कमला हॅरीस नावाची ही महिला एकदिवस अमेरिकेच्या राष्ट्रपती बनू शकते, असे म्हटले जातेय,’असे मल्लिकाने या ट्विटमध्ये म्हटले होते. मल्लिकाचे हे ट्विट काही अंशी सत्य ठरले आहे. या ट्विटनंतर 11 वर्षांनंतर खरोखरच कमला हॅरीस अमेरिकन उपराष्ट्राध्यक्षपदी विराजमान होत आहेत.
कोण आहे कमला हॅरीस?
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदी जो बायडन विराजमान झालेत. तर उपराष्ट्राध्यक्षपदी कमला हॅरीस यांची निवड झाली आहे.
कमला हॅरीस या डेमोक्रेटीक पक्षाच्या उमेदवार असून राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडन यांनी उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी कमला हॅरीस यांच्या नावाची घोषणा केली होती. आता डेमोक्रेटीक पक्षाने अमेरिकेतील निवडणुकीत वर्चस्व सिद्ध केल्यामुळे कमला हॅरीस यांनाही उपराष्ट्रपती पदाचा सन्मान मिळणार आहे. अमेरिकेतील या महत्त्वाच्या पदासाठी निवडणूक लढवणारी पहिली कृष्णवर्गीय महिला म्हणून कमला हॅरीस मैदानात उतरल्या होत्या. कमला हॅरीस यांचे मूळ भारतीय असून भारताशी त्यांचे जवळचे नाते आहे. हॅरिस यांची आई शामला गोपालन म्हणजे भारतीय आणि वडील डोनल्ड हॅरिस म्हणजे जमैकन. वडील ख्रिस्ती, आई हिंदू. कमला ब्लॅक बॅप्टिस्ट चर्चमधे जातात. नवरा डग्लस एमहॉफ हा ज्यू आहे.कमला हॅरीस यांचे भारताशी नाते असल्यामुळेच तामिळनाडूतील थुलासेंद्रपुरम या गावात उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून कमला हरीस यांचे पोस्टर्स झळकले होते. येथील गावक-यांनी बॅनरबाजी करत कमला हॅरीस यांना आपला पाठिंबा दर्शवला होता.
मल्लिका ते मर्डर गर्ल...! वाचा रिमाची ‘हिरोईन’ बनण्याची कहाणी
तुझ्या चित्रपटांमुळेच महिलांवर अत्याचार होतात....! युजरने डिवचले; मल्लिका शेरावतने सुनावले