Join us

Video: सिनेमांपासून दूर अमेरिकेत 'या' आलिशान बंगल्यात राहते मल्लिका शेरावत, दाखवली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 13:52 IST

मल्लिका शेरावतने नुकताच इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला.

'मर्डर' फेम अभिनेत्री मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) अनेक वर्षांपासून लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक झाली आहे. नुकतंच ती पॅरिसमध्ये सुट्ट्या एन्जॉय करुन पुन्हा लॉस एंजेलिसमध्ये परत आली आहे. तिच्या लॉस एंजेलिसमध्ये आलिशान बंगल्याची झलक तिने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

मल्लिका शेरावतने नुकताच इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला. यामध्ये सुंदर ऊन पडलं आहे. मल्लिका तिच्या घरातून बाहेर येते आणि तिच्या पाळीव कुत्र्यासोबत बसते. यावेळी तिने आकाशी रंगाचा गाऊन घातला आहे ज्यात ती सुंदर दिसत आहे. मल्लिकाचा हा लॉस एंजेलिस मधला दोन मजली बंगला आहे. घरासमोरही मोठी जागा आहे. स्वीमिंग पूलही आहे. 'घरी परतल्यानंतर खूप बरं वाटतंय. लॉस एंजेलिसला खूप मिस केलं.' असं कॅप्शन तिने लिहिलं आहे.

मल्लिका शेरावतने 2003 साली 'ख्वाहीश' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर तिने 'मर्डर', 'डरना जरुरी है', 'वेलकम', 'प्यार के साई़ड इफेक्ट्स'  या सिनेमांमध्ये काम केलं. याशिवाय तिने काही हॉलिवूड सिनेमेही केले. 2021 साली ती RKay सिनेमात शेवटची दिसली . 

टॅग्स :मल्लिका शेरावतअमेरिकासुंदर गृहनियोजनबॉलिवूड