मल्लिका शेरावतने म्हटले, ‘महात्मा गांधींची भूमी बलात्काऱ्यांचा अड्डा बनत आहे’!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 4:11 PM
बॉलिवूडमधून गायब असलेली अभिनेत्री मल्लिका शेरावत बºयाच काळानंतर लाइमलाइटमध्ये आली आहे. ‘मर्डर’ या चित्रपटातून सनसनी म्हणून समोर आलेली मल्लिका ...
बॉलिवूडमधून गायब असलेली अभिनेत्री मल्लिका शेरावत बºयाच काळानंतर लाइमलाइटमध्ये आली आहे. ‘मर्डर’ या चित्रपटातून सनसनी म्हणून समोर आलेली मल्लिका यावेळेस तिच्या कोण्या चित्रपटामुळे नव्हे तर तिच्या वक्तव्यामुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. मल्लिकाने देशात समोर येत असलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनांवर अतिशय तिखट शब्दांमध्ये प्रतिक्रिया व्यक्त केली. मल्लिकाने म्हटले की, ‘भारत बलात्काºयांचा अड्डा बनत आहे.’ मल्लिका बºयाच काळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. कथुआ, उन्नाव येथील घटनांमुळे संपूर्ण देश हादरला असून, याविषयी आक्रोश करताना मल्लिकाने अशाप्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली. मल्लिकाने म्हटले की, ‘भारत महात्मा गांधी यांच्या भूमितून सामूहिक बलात्कार करणाºयांची भूमी बनत आहे. मल्लिका बुधवारी ‘दास देव’च्या विशेष स्क्रीनिंगप्रसंगी माध्यमांशी बोलत होती. मल्लिकाने म्हटले की, ‘मला असे वाटते की, या देशात महिला आणि मुलांसोबत जे काही घडत आहे ते खरोखरच लाजीरवाणे आहे. गांधींच्या भूमीतून आपण सामूहिक दुष्कर्म करणाºयांच्या भूमित बदलत आहोत. मला असे वाटते की, माध्यमांमध्येच ती ताकद आहे, जे हे सर्व काही बदलवू शकेल. आम्हाला माध्यमांकडूनच आता अपेक्षा आहेत.’पुढे बोलताना मल्लिकाने लिहिले की, ‘जर या घटनांवर माध्यमांचे लक्ष गेले नसते तर याविषयी कोणालाच काही समजले नसते. मला असे वाटते की, माध्यमांच्या दबावामुळेच कायद्यात आमूलाग्र बदल करण्यात आले. त्यामुळे माध्यमांचे खरोखरच आभार मानायला हवेत. सुधीर मिश्रा दिग्दर्शित ‘दास देव’विषयी मल्लिकाने म्हटले की, ‘मी चित्रपटाचा ट्रेलर बघितला. मी सुधीर मिश्रा यांच्या चित्रपटांची सुरुवातीपासूनच प्रशंसक राहिली आहे. एक दिग्दर्शक म्हणून मी त्यांच्यावर प्रेम करते.’ यावेळी मल्लिकाने तिच्या आगामी चित्रपटांबद्दलही सांगितले. तिने म्हटले की, एक आंतरराष्टÑीय मालिका आहे, ज्याची भारतात निर्मिती करण्यासाठीचे अधिकार मी खरेदी केले आहे. जसे ‘२४’ या अमेरिकन सीरिजची भारतात निर्मिती केली गेली. मी याविषयीची घोषणा लवकरच करणार आहे. या शोला एमी पुरस्कार मिळाला आहे. दरम्यान, बºयाच दिवसांनंतर मल्लिकाने अतिशय ठोसपणे आपली भूमिका मांडली. मल्लिका अखेरीस २०१५ मध्ये आलेल्या ‘डर्टी पॉलिटिक्स’ या चित्रपटात बघावयास मिळाली होती.