2004 मध्ये ‘मर्डर’ या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये खळबळ माजवणारी मल्लिका शेरावत (Mallika Sherawat ) एक अतिशय बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. भलेही मल्लिका चित्रपटांपासून दूर आहे, पण या ना त्या कारणानं चर्चेत राहणं तिला चांगलंच जमतं. आता काय तर ‘मर्डर गर्ल’च्या साडीची चर्चा रंगलीये. चित्रपटांपासून दूर असलेली मल्लिका नुकतीच एक कॉमेडी शो जज करायला पोहोचली. व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर पडताना ती पापाराझींच्या कॅमे-यात कैद झाली. मग काय, तिच्या या लुकचीच चर्चा सुरू झाली. काहींनी तिचा हा लुक जरा विचित्र वाटला.
दीर्घकाळापासून विदेशात मुक्कामाला असलेली मल्लिका सध्या मुंबईत आहे. अलीकडे ती ‘झी कॉमेडी’ शो जज करायला पोहोचली. निळीशार साडी घालून मल्लिका सेटवर पोहोचली आणि सेटवरचा तिचा व्हिडीओ क्षणात व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया युजर्सनी कमेंट्स करायला सुरूवात केली. मल्लिकाची साडी पाहून काहींनी तिला ट्रोलही केलं.
साडी सारख्या सुंदर व सौज्वळ पोशाखाला पूर्णपणे बर्बाद केलं. फॅशनच्या नावावर हे अतिचं झालंय, असं एका युजरनं लिहिलं. एका युजरने तर चांगलीच मजेशीर कमेंट केली. ‘प्लीज साडीला एकटं सोड, इतक्या सुंदर पोशाखाची नुसती वाट लावली’, असं या युजरनं लिहिलं. प्लीज ही साडी आहे, असं म्हणू नका, अशा शब्दांत एका युजरनं मल्लिकाची खिल्ली उडवली. मल्लिका शेरावत सध्या चित्रपटांपासून दूर आहे. पण सोशल मीडियावर मात्र प्रचंड अॅक्टिव्ह आहे. स्वत:चे बोल्ड व ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते. 2017 मध्ये मल्लिका अखेरची ‘जीनत’ या सिनेमात दिसली होती. यानंतर तिने वेबसीरिजकडे मोर्चा वळवला. ‘द स्टोरी’ आणि ‘बू सबकी फटेगी’ या वेबसीरिजमध्ये ती झळकली.