Join us  

साऊथ फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का! मल्याळम सिनेमातील लोकप्रिय खलनायक कझान खान यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 10:02 AM

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकार अचानक हे जग सोडून गेले.

मनोरंजनसृष्टीत मृत्यूसत्र सुरुच आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकार अचानक हे जग सोडून गेले. नुकतंच 'असुरन' फिल्मच्या सपोर्टिंग कलाकाराचं अपघातात निधन झालं तर आता मल्याळम अभिनेता कझान खानच्या (Kazan Khan) मृत्यूची बातमी आली आहे. १२ जून रोजी कझान खानचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने साऊथ फिल्मइंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.

प्रोडक्शन कंट्रोलर आणि प्रोड्युसर एनएम बदूशा यांनी कझान खानच्या मृत्यूची माहिती फेसबुकवरुन दिली. त्यांनी कझान खान यांचा एक फोटो फेसबुकवर पोस्ट केला. त्यांनी लिहिले, 'लोकप्रिय खलनायक कझान खान यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. CID मुसा, वर्णपाकिट इत्यादी अनेक चित्रपटात त्यांनी काम केलं आहे.  

कझान खान यांनी 1992 मध्ये सेंथामिझ पट्टू सिनेमातून डेब्यू केले. यानंतर त्यांनी 'सेतुपति आईपीएस','कलाईगनान','मुरई मामन' आणि 'करुप्पा नीला' सारख्या सिनेमांमध्ये काम केले. कझान खान यांनी तमिळ आणि मल्याळम भाषांतील ५० पेक्षा अधिक सिनेमात काम केले आहे. ते खलनायकाच्या भूमिका करायचे. व्हिलनच्या भयानक अवतारात ते मोठ्या पडद्यावर यायचे आणि त्यांचे एक्सप्रेशनही भीतीदायक असायचे. खलनायक म्हणूनच त्यांना जास्त पसंती मिळाली होती.

1995 साली कझान खान यांनी मल्याळम सिनेमात काम करणे सुरु केले होते. ममूटी यांची फिल्म 'द किंग' मधील विक्रम घोरपडे या भूमिकेने ते हिट झाले होते. तर 2015 साली आलेली 'लैला ओ लैला' ही त्यांचा शेवटचा सिनेमा. त्यानंतर ते ८ वर्ष फिल्मइंडस्ट्रीपासून दूर होते. त्यांनी अभिनयातून ब्रेक घेतला होता. त्यांच्या निधनाने साऊथ फिल्मइंडस्ट्री शोकसागरात बुडाली आहे.

टॅग्स :सिनेमामृत्यूहृदयविकाराचा झटका