Join us

ममता कुलकर्णी पुन्हा देश सोडून निघाली दुबईला; म्हणाली, "जानेवारीत 'या' खास कारणासाठी परतणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 17:08 IST

जानेवारी महिन्याच्या मध्यात ती एका खास कारणासाठी परत येणार आहे. Video शेअर करत सांगितलं कारण

'करण अर्जुन' फेम अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) काही दिवसांपूर्वीच भारतात परतली. २००० साली देश सोडल्यानंतर २४ वर्षांनी तिने पुन्हा भारतात पाऊल ठेवलं. देशात येताच तिची भाषा, तिचा अॅटिट्यूड सगळंच बदललेलं दिसलं. तसंच इतक्या वर्षांनी परत आल्याने तिला खूप लाईमलाईटही मिळालं. आता ममता पुन्हा भारत सोडून दुबईला निघाली आली आहे. मात्र जानेवारी महिन्याच्या मध्यात ती एका खास कारणासाठी परत येणार आहे.

५२ वर्षीय  ममता कुलकर्णी सध्या चर्चेत आहे. करिअरच्या शिखरावर असतानाच २००० साली ममता देश सोडून गेली होती. २००० कोटींच्या ड्रग्स तस्करी प्रकरणात ती अडकली होती.केन्यातील आंतरराष्ट्रीय ड्रग ग्रुपसोबत तिचं कनेक्शन असल्याचा तिच्यावर आरोप होता. सर्व आरोपांमधून मुक्तता झाल्यानंतर ममता २४ वर्षांनी भारतात आली. तिने अनेक मुलाखतीही दिल्या. अभिनयात कमबॅक करण्याचा हेतू नसल्याचंही तिने स्पष्ट केलं. आता ममताने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ती दुबईला निघाली आहे. व्हिडिओत ती म्हणते, "नमस्कार, आज बुधवार आहे आणि उद्या गुरुवार. उद्या रात्री मी दुबईला परत जात आहे. मग जानेवारीच्या मध्यात मी पुन्हा भारतात येईन. २५ जानेवारीनंतर अलाहाबाद येथे होणाऱ्या कुंभमेळामध्ये सहभागी होणार आहे. भारतात आल्यावर तुम्ही सर्वांनी मला जे प्रेम दिलंत त्यासाठी मी मनापासून आभार मानते."

ममताने 'आशिक',  'आवारा',  'क्रांतिवीर', 'वक्त हमारा हैं', 'सबसे बडा खिलाडी' तसेच 'करण अर्जुन' यांसारखे हिट सिनेमे दिले. बऱ्याच चित्रपटांमध्ये काम करण्यास नकार दिल्याने ममता कुलकर्णीला त्याकाळी बॉलिवूडमधील रिजेक्शन क्वीन म्हटलं जायचं. अमली पदार्थ तस्करीप्रकरणी ममता आणि तिच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यशाच्या शिखरावर असताना अचानक तिच्या करिअरला उतरती कळा लागली. त्यानंतर ती बॉलिवूडमधून गायब झाली. 

टॅग्स :ममता कुलकर्णीबॉलिवूडभारतदुबईसोशल मीडिया