बनावट अरमान मलिकचा खेळ खल्लास...अरमान मलिक असल्याचे सांगत महिलांना करायचा ब्लॅकमेल, झाला गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 05:52 PM2019-05-30T17:52:22+5:302019-05-30T17:52:44+5:30
सोशल मीडियावर अरमान मलिक बनून महिलांशी मैत्री करून त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या इसमाला पोलिसांनी गजाआड केले आहे.
सायबर क्राईमच्या गुन्ह्यात सध्या वाढ होताना पहायला मिळत आहे. सोशल मीडियावर अरमान मलिक बनून महिलांशी मैत्री करून त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या इसमाला पोलिसांनी गजाआड केले आहे.
तमीळनाडूतील विल्लुपुरम जिल्ल्ह्यातील तीस वर्षीय महेंद्र वर्मनवर हा आरोप करण्यात आला आहे की त्याने फेसबुक व व्हॉट्सअपच्या माध्यमातून बॉलिवूड सिंगर असल्याचे सांगून मैत्री करायचा. त्यानंतर त्या महिलांचे पर्सनल फोटो मागायचा आणि फोटो मिळाल्यानंतर त्या महिलांना ब्लॅकमेल करायचा. पोलिसांनी सांगितले की, आरोपी महिलांचे फोटो व्हायरल करून धमकी देऊन त्यांच्याकडे पैशांची मागणी करत होता. या आरोपीने असे जवळपास लाखो रुपये जमा केले.
एका महिलेने महेंद्र वर्मनची तक्रार केल्यानंतर सीबीआयने त्या व्यक्तीला पकडण्यासाठी योजना आखली आणि आरोपीला पैसे घेण्यासाठी एका ठिकाणी बोलवण्यात आले. त्या ठिकाणी महिलेशी वार्ता करताना पोलिसांनी त्याला अटक केली.