बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या कोरोनावर उपचार घेत आहेत. गेल्या 11 जुलैला अमिताभ यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. तेव्हापासून ते रूग्णालयात आहेत. अशात बिग बी यांचे चाहते, बॉलिवूडकर ते लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करत आहेत. मात्र काही असेही लोक आहेत,जे अशास्थितीत अमिताभ यांच्याबद्दल अपशब्दांचा वापर करत आहेत. अशा लोकांवर अमिताभ यांनी संताप व्यक्त केला आहे.अलीकडे एका युजरने अमिताभ यांच्यासाठी नको ते लिहिले. ‘माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही कोरोनामुळे मरावे,’ असे या व्यक्तिने लिहिले. खुद्द अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगममध्ये याची माहिती देत आपला संताप व्यक्त केला आहे.
कोरोनाने मेलास तर बरा...! हेटर्सच्या या वाक्याने कधी नव्हे इतके भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले ठोक दो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 15:30 IST
ब्लॉग लिहून व्यक्त केला संताप...
कोरोनाने मेलास तर बरा...! हेटर्सच्या या वाक्याने कधी नव्हे इतके भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले ठोक दो...
ठळक मुद्देअमिताभ यांचा हा ब्लॉग सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.