Join us

'राम तेरी गंगा मैली'मध्ये बोल्ड सीन देणाऱ्या मंदाकिनीचं एका क्षणात उद्धवस्त झालं करिअर, आता जगतेय असं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 8:00 AM

'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री मंदाकिनी आजही चर्चेत असते.

 80 च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री. आज (30 जुलै) मंदाकिनीचा वाढदिवस. वयाच्या 16 व्या वर्षी यास्मिनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण या यास्मिनला खरी ओळख दिली ती राज कपूर यांच्या ‘ राम तेरी गंगा मैली’ या सिनेमाने. या चित्रपटातील तिने दिलेल्या बोल्ड सीनची आजही चर्चा होते. तिचे खरे नाव यास्मिन जोसेफ. आपण तिला ओळखतो ते मंदाकिनी या नावाने. 

1985 मध्ये ‘अंतारेर भालोबाशा’ या बंगाली सिनेमात ती पहिल्यांदा झळकली होती. याचवर्षी ‘मेरा साथी’ या सिनेमाद्वारे मंदाकिनीने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. 1985 मध्येच तिला आणखी दोन हिंदी सिनेमे मिळाले. यातला पहिला म्हणजे ‘आर पार’ आणि दुसरा म्हणजे, ‘राम तेरी गंगा मैली’. ‘राम तेरी गंगा मैली’ हा सिनेमा तुफान गाजला. या सिनेमाने मंदाकिनीचे करिअर यशोशिखरावर नेले.

बोल्ड अभिनेत्री म्हणून मंदाकिनी चर्चेत होतीच. पण याचदरम्यान मंदाकिनीचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसोबत जुळले होते. दाऊदच्या नावानेही बॉलिवूडचा थरकाप उडायचा. त्यामुळे बरेच दिग्दर्शक मंदाकिनीसह काम करण्यास उत्सुक नव्हते. एका मुलाखतीत मंदाकिनी यावर बोलली होती. 1994 मध्ये प्रकाशित दाऊदसोबतच्या त्या फोटोने माझे आयुष्य बदलून टाकले. माझा व दाऊदचा एक मुलगा आहे, असाही दावा केला गेला. पण यात काहीही तथ्य नाही. शोसाठी मी सर्रास दुबईला जायचे. अशाच एका शोमध्ये मी दाऊदला भेटले होते. पण आमच्यात काहीही नव्हते, असे ती म्हणाली होती.

दाऊदसोबत नाव आल्याने मंदाकिनीला सिनेमे मिळेनासे झालेत आणि तिला फिल्मी करिअर सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. 1990 मध्ये प्रसिद्ध डॉक्टर कग्यूर टी. रिनपोचे ठाकुर यांच्यासोबत तिने लग्न केले. सध्या ती पतीसोबत मुंबईत वास्तव्यास आहे. मुंबईत ती तिब्बती हर्बल सेंटर चालवते. 

1991 मध्ये देशवासी आणि 1996मध्ये जोरदार या सिनेमात मंदाकिनी झळकली. जोरदार हा तिच्या करिअरमधील शेवटचा सिनेमा ठरला. तिला एक मुलगी असून तिच्या मुलीचे नाव रब्जा इनाया ठाकूर असे आहे. 

टॅग्स :मंदाकिनी