Join us  

आता कशी दिसते 'राम तेरी गंगा मैली'ची अभिनेत्री मंदाकिनी, इतक्या वर्षांत खूप बदलला लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2022 3:20 PM

Mandakini Now and Then: मंदाकिनीने तिच्या करिअरमध्ये 'राम तेरी गंगा मैली' (Ram Teri Ganga Maili) सोबतच 'डांस-डांस', 'लोहा', 'जाल', 'शेशनाग' आणि 'तेज़ाब' सारख्या अनेक सिनेमात काम केलं.

Mandakini Now and Then: बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवणारी अभिनेत्री मंदाकिनी (Mandakini) आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहे. राज कपूर यांच्या 'राम तेरी गंगा मैली' (Ram Teri Ganga Maili) ने मंदाकिनीला रातोरात स्टार बनवलं होतं. या सिनेमातून तिने तिच्या सौंदर्याने आणि निरागसपणाने सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. या सिनेमाच्या यशानंतरही मंदाकिनीच्या करिअरला फार वेग मिळाला नाही. त्यानंतर काही वर्षातच ती इंडस्ट्रीपासून दूर गेली.

मंदाकिनीने तिच्या करिअरमध्ये 'राम तेरी गंगा मैली' (Ram Teri Ganga Maili) सोबतच 'डांस-डांस', 'लोहा', 'जाल', 'शेशनाग' आणि 'तेज़ाब' सारख्या अनेक सिनेमात काम केलं. पण तरीही तिच्या करिअरला हवं तसं यश मिळालं नाही. ती अखेरची १९९६ मध्ये 'जोरदार' या सिनेमात दिसली होती. काही वर्षांनी तिने बॉलिवूड सोडलं आणि लग्न करून संसार थाटला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंदाकिनी आता तिबेटमध्ये योगा क्लासेस चालवते.

मंदाकिनीचा लूक आधीपेक्षा आता खूप बदलला आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते. लोक आजही मंदाकिनीच्या सौंदर्याचे फॅन आहेत. आजही मंदाकिनी ५८ वर्षांची होऊनही ग्रेसफुल आणि फिट दिसते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंदाकिनी तिबेटमध्ये योगा क्लासेस चालवते तसेच तिबेटी औषधांचा व्यापार करते. 

टॅग्स :मंदाकिनीबॉलिवूड