बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदीचा नवरा दिग्दर्शक राज कौशल यांचे ३० जून रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे अचानक निधन झाले. त्यामुळे मंदिरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मंदिराने नवऱ्याच्या निधनाच्या काही तास आधी सोशल मीडियावर काही स्टोरीही शेअर केल्या होत्या. जेव्हा तिला असे काही घडेल याची चाहूल देखील नव्हती.
मंदिरा बेदी ही फिटनेस फ्रीक आहे. बऱ्याचदा ती सोशल मीडियावर वर्कआउट करतानाचा फोटो शेअर करत असतात. नेमके तिने २९ जूनच्या रात्री स्टोरीवर वर्कआऊट करतानाचा एक फोटो शेअर केला होता आणि लिहिले होते की, धावा, उड्या मारा आनंदी राहा.
इतकेच नाही तर राज कौशल यांच्या मृत्यूच्या दोन दिवस आधीही मंदिरा बेदीने एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये मंदिराने म्हटले होते की, ‘कोणतीही अपराधीपणाची भावना नाही. वेळ ठरवत नाही की तुम्ही कोणाच्या किती जवळ आहात. खूप लोक आहेत ज्यांना मी वर्षानुवर्षे ओळखते, त्यांच्यासोबत संबंध संपले की ते कधी नव्हतेच आणि काही नव्याने संबंध प्रस्थापित झाले आहेत जे वाटते की अनेक वर्षानुवर्षांचे आहेत. त्यामुळे पुढे जा आणि नव्याला आपलसे करा. कोणत्याही अपराधीपणाच्या भावनेशिवाय आणि प्रश्नांशिवाय.