कंगना राणौतचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ गत आठवड्यात चित्रपटगृहांत झळकला आणि रिलीज होताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कब्जा मिळवला. चित्रपट रिलीज होऊन चार दिवस झालेत आणि या चार दिवसांत या चित्रपटाने बक्कळ कमाई केली.होय, ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, गत चार दिवसांत या चित्रपटाने ४७ कोटी रूपयांची कमाई केली आहे. काल सोमवारी म्हणजे, दुस-या आठवड्याच्या पहिल्या दिवशी कंगनाच्या या चित्रपटाने शानदार बिझनेस केला. अर्थात चौथ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत ४१.७१ टक्क्यांची घसरण झाली.
रिलीजच्या पहिल्याच दिवशी धमाकेदार सुरुवात करत, या चित्रपटाने ८.७५ कोटी रूपये कमावले. यानंतर दुस-याचं दिवशी सगळ्यांना धक्का देत, थेट १८.१० कोटींवर झेप घेतली. रविवारी हा चित्रपट पाहायला प्रेक्षकांच्या रांगा लागल्या आणि या चित्रपटाने १५.७० कोटींची कमाई केली. सोमवारी या चित्रपटाने ५.१० कोटी कमावले. कमाईचा एकूण आकडा ४७.६५ कोटींच्या घरात आहे.