Join us

‘मर्णिकर्णिका’चे दिग्दर्शक क्रिश यांचे कंगना राणौतवर गंभीर आरोप, वाचाच...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 10:40 AM

कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट एकीकडे बॉक्स आॅफिसवर गाजत असताना दुसरीकडे या चित्रपटाचे दिग्दर्शक क्रिश यांनी कंगनाविरोधात मोर्चा उघडला आहे. 

ठळक मुद्देक्रिश हे या चित्रपटाचे अधिकृत दिग्दर्शक आहेत. त्यांच्या दिग्दर्शनाखाली चित्रपट पूर्ण झाल्यानंतर अचानक चित्रपटात काही पॅचवर्क व नवे सीन्स टाकण्याचा निर्णय घेतला गेला आणि क्रिश यांच्या अनुपस्थित   कंगनाने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सगळी सूत्रे आपल्या हाता

कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट एकीकडे बॉक्स आॅफिसवर गाजत असताना दुसरीकडे या चित्रपटाचे दिग्दर्शक क्रिश यांनी कंगनाविरोधात मोर्चा उघडला आहे. क्रिश हे या चित्रपटाचे अधिकृत दिग्दर्शक आहेत. त्यांच्या दिग्दर्शनाखाली चित्रपट पूर्ण झाल्यानंतर अचानक चित्रपटात काही पॅचवर्क व नवे सीन्स टाकण्याचा निर्णय घेतला गेला आणि क्रिश यांच्या अनुपस्थित   कंगनाने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली. यानंतर चित्रपटाच्या क्रेडिट लाईनमध्ये दिग्दर्शकाच्या नावावरून वेगवेगळी चर्चा सुरू झाली. पुढे निर्मात्यांनी कंगनाला दिग्दर्शनाचे श्रेय देणार आणि देणार, असे ठणकावून सांगितले आणि कंगना या चित्रपटाची दिग्दर्शक ठरली. या सगळ्या एपिसोडवर क्रिश यांनी पहिल्यांदा आपले मौन सोडत,कंगनावर अनेक आरोप केले आहेत. कंगनाने चित्रपटात सुरुवातीपासूनचं गरजेपेक्षा अधिक दखल दिली. शिवाय स्वत:ला अधिकाकधिक स्पेस मिळावी, यासाठी सर्वांच्या भूमिकांना कात्री लावली, असा आरोप क्रिश यांनी केला आहे.

एका ताज्या मुलाखतीत क्रिश बोलते.  ‘मणिकर्णिका’चे पहिले पोस्टर रिलीज झाले त्यावर दिग्दर्शक म्हणून माझे नाव होते. टीजरमध्येही माझे नाव होते. पण तसे नाही, जसे याआधीच्या माझ्या चित्रपटात होते. टीजरमध्ये दिग्दर्शक म्हणून राधा कृष्णा जगरलामूदी असे माझे नाव टाकण्यात आले, जे मी कधीच वापरत नाही. मी हे बदलावे, म्हणून कंगनाशी संपर्क साधला असता ती नाराज झाली. तुम्ही मला सोनू सूद प्रकरणात मदत केली नाही आणि आता नाव बदलण्यासाठी आलात. तुम्हाला अँगर मॅनेजमेंट इश्यू आहेत, असे बरळत ती माझ्यावर अक्षरश: ओरडायला लागली. मी चित्रपट पाहिला तेव्हा माझे नाव सेपरेट स्लाईडवर होते. कंगना स्वत:चे नाव डायरेक्शन फर्स्ट क्रेडिटमध्ये ठेवून कशी शांत झोपू शकते, हेच मला कळत नाही. फर्स्ट क्रेडिटवर तिचा हक्क नाहीच, असे क्रिश म्हणाले.

पुढे क्रिश यांनी सांगितले की,जूनमध्ये चित्रपटाची एडिटींग पूर्ण झाली होती. कंगना सोडून सर्वांचे डबिंगही झाले होते. कंगना त्यावेळी लंडनमध्ये ‘मेंटल है क्या’चे शूटींग करत होती. परत आल्यावर तिने चित्रपट पाहिला आणि मला हा आवडला. पण यात काही लहान-सहान बदल हवे असल्याची तीम्हणाली. काही दिवसानंतर याची भूमिका जास्त आहे, याला अधिक महत्त्व दिले आहे, हा बदल करायचाय, तो बदल हवायं, असे तिने सुरु केले. निर्माता कमल जैन यांनाही चित्रपट आवडला नसल्याचे तिने मला सांगितले.

टॅग्स :कंगना राणौतमाणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी