बॉलिवूडची क्वीन कंगना रानौतचा 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' या आगामी बहुचर्चित चित्रपटाचा टीझर 15 ऑगस्टला रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटात कंगना राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात राणी लक्ष्मी बाईंची शौर्यगाथा पाहायला मिळणार आहे. कंगनाने नुकतेच चित्रपटाचे काही सीन्स पाहिले आणि मेकर्ससोबत बसून चित्रपटाच टीजर स्वातंत्र दिनी रिलीज करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटाचे प्रोड्यूसर कमल जैन आहेत. त्यांच्या मुंबई ऑफिसमध्ये पोहोचून कंगनाने त्यांची भेट घेतली.'मणिकर्णिका'ची पटकथा 'बाहुबली'चे लेखक विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिले आहेत. त्यांना लक्ष्मीबाईंची कथा यूनिवर्सल वाटली. त्यांनी चित्रपटाची पटकथा लिहिण्याचा निर्णय घेतला. दुसरे कारण म्हणजे हा चित्रपट 'बाहुबली'सारखा बिग बजेटचा बनवण्यात आला आहे. एका मुलाखतीत विजयेंद्र म्हणाले होते की, 'ही कथा मीच लिहू शकलो असतो, कारण स्वतः माझ्या मुलीचे नाव मणिकर्णिका आहे. मी बालपणी लक्ष्मीबाईंच्या कथा ऐकल्या होत्या. त्यामुळे मी माझ्या मुलीचे नाव मणिकर्णिका ठेवले. मी बऱ्याच काळापासून या कथेवर चित्रपट बनवण्याचा विचार करत होतो.'या चित्रपटाचे कॉश्च्युम नीता लुल्लाने डिझाइन केले आहेत. त्यासाठी त्यांना सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ लागला. या कामात त्यांच्यासोबत जवळपास 40 लोग होते. तर सिनेमातील अॅक्शन सीन निक पॉवेलने डिझाइन केले आहेत. 15 दिवसांमध्ये निक अमेरिकेतून भारतात आले. लढाईच्या दृश्यांचे चित्रीकरण दोन हजार लोकांसोबत केले. तर कंगनाने शूटवर जाण्यापूर्वी 40 दिवस तलवारबाजी शिकली. तिच्यासोबतच अंकिता लोखंडे आणि डॅनीची ट्रेनिंगही निकने भारतात येताच सुरु केली होती. घोडेस्वारी शिकण्यासाठी सर्वांनी दोन महिने दिले. कंगनाचे चाहते 'मणिकर्णिका'चा टीझर पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.
'मणिकर्णिका'चा टीझर या तारखेला होणार रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 3:34 PM
कंगना रानौत राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे.
ठळक मुद्दे'मणिकर्णिका' या चित्रपटात पाहायला मिळणार राणी लक्ष्मी बाईंची शौर्यगाथा नीता लुल्लाने केले कॉश्च्युम डिझाइन सिनेमातील अॅक्शन सीन डिझाइन केले निक पॉवेलनेकंगना शिकली 40 दिवसात तलवारबाजी