Join us

'घटस्फोट, कॅन्सरशी झुंज..' अशी झाली आहे अभिनेत्रीची अवस्था, खंत व्यक्त करत म्हणाली, 'दु:ख..'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 9:44 AM

आता परत लग्न तर मी करु शकत नाही. पण कधी कधी वाटतं जोडीदार असला असता तर...

90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये आघाडीवर असलेली अभिनेत्री मनिषा कोइराला (Manisha Koirala) सध्या कुठे आहे असा प्रश्न पडतो. घटस्फोट, कॅन्सरशी झुंज असे अनेक चढ उतार तिच्या आयुष्यात आले. आता मनिषाला ओळखणंही कठीण झालंय. कॅन्सरशी दोन हात केल्यानंतर काही वर्षांनी मनिषाने कमबॅक केले. 'डियर माया','लस्ट स्टोरी','संजू,'प्रस्थानम' यासारख्या सिनेमात काम केले. 'संजू' सिनेमात तिने रणबीर कपूरच्या आईची भूमिका साकारली होती. तर नुकत्याच आलेल्या कार्तिक आर्यनच्या 'शहजादा' सिनेमातही ती अभिनेत्याच्या आईच्या भूमिकेत दिसली. सतत आईच्या भूमिका मिळत असल्याने आता मनिषाने खंत व्यक्त केली आहे. 

एकेकाळी मुख्य अभिनेत्री म्हणून मिरवणारी मनिषा कोइराला आता सिनेमात मुख्य अभिनेत्यांच्या आईच्या भूमिकेत दिसत आहे. यावरच दु:ख व्यक्त करताना ती म्हणाली, 'वय वाढत असताना कोणत्या सिनेमात मुख्य भूमिका न साकारणं शांतता देणारं आहे. 'शहजादा' सिनेमात कार्तिकच्या आईची भूमिका स्वीकारली कारण त्याआधी एक गंभीर कॅरेक्टर केल्यानंतर मला एक कमर्शियल ड्रामा करायचा होता. जेव्हा कोणी मुख्य भूमिका करतं तेव्हा संपूर्ण जग त्याच्याभोवती फिरतं. पण साईड रोल केले तर सगळा सेटअप बदलतो. मला थोडं दु:ख झालं आणि वेळ पुढे गेली आहे याचीही जाणीव झाली. आता माझ्याकडे ते स्टारडम राहिलेलं नाही. नव्या अभिनेत्री आल्या आहेत.

मूल दत्तक घेण्याबद्दल मनिषा म्हणाली, 'आता परत लग्न तर मी करु शकत नाही. पण कधी कधी मला वाटतं माझा जोडीदार असला असता तर माझं आयुष्य आणखी सुखकर झालं असतं? खरं सांगू तर मला माहित नाही. मला वाटतं माझं आयुष्य पूर्ण आहे. माझे दोन पाळीव प्राणी आहेत जे मला मुलांसारखेच आहेत. तसंच सोबत इतके चांगले पालक आहेत. छान मित्रपरिवार आहे. मूल दत्तक घेणं हे खूप जबाबदारीचं काम आहे. तसा आत्मविश्वास तुमच्यात असावा लागतो. जेव्हा मला वाटेल तो आत्मविश्वास माझ्यामध्ये आला आहे तेव्हा मी नक्कीच विचार करेन.'

टॅग्स :मनिषा कोईरालाघटस्फोटकर्करोगबॉलिवूड