Join us

मनीषा कोईरालाने २८ वर्षे केली भन्साळींच्या फोनची प्रतीक्षा, 'हीरामंडी'मुळे पुन्हा आले एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 8:06 PM

Manisha Koirala : मनीषा कोईराला ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. हिरामंडीपूर्वी तिने संजय लीला भन्साळी यांच्यासोबत १९९६ च्या खामोशी द म्युझिकलमध्ये काम केले होते. भन्साळी यांनी या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले.

संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची बहुप्रतिक्षित वेबसीरिज 'हीरामंडी द डायमंड बझार'(Heeramandi The Diamond Bazar)चा ट्रेलर रिलीज झाला आहे. राजवाड्यापासून क्रांतीपर्यंतची कथा सांगणाऱ्या हीरामंडीमध्येही मनीषा कोईरालाचा अभिनय उत्कृष्ट होता. मनीषा कोईराला ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. हिरामंडीपूर्वी तिने संजय लीला भन्साळी यांच्यासोबत १९९६ च्या खामोशी द म्युझिकलमध्ये काम केले होते. भन्साळी यांनी या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. चित्रपट फ्लॉप झाला, पण भन्साळींच्या कामाचे कौतुक झाले.

भन्साळी २८ वर्षांनंतर त्यांच्या चित्रपटातील पहिल्या नायिकेसोबत काम करत आहेत. हीरामंडीच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी, मनीषाने जवळपास तीन दशकांनंतर दिग्गज दिग्दर्शकासोबत काम केल्याबद्दल प्रतिक्रिया दिली. गेल्या २८ वर्षांपासून ती भन्साळींच्या कॉलची वाट पाहत होती, असे तिने सांगितले.

हीरामंडीच्या ट्रेलर लॉन्चवेळी मनीषा कोईराला म्हणाली, "मी २८ वर्षे संजयच्या कॉलची वाट पाहत आहे आणि ही आनंदाची बाब आहे. अशा प्रतिभावान व्यक्तीसोबत काम करणे हा सन्मान आहे. खूप मेहनत, प्रेम आणि आपुलकीने, आम्ही ही (हिरमंडी) बनवली आहे, आशा आहे की तुम्हा सर्वांना ते आवडेल, हे आम्ही पहिल्यांदाच पाहिले आहे.

ही सीरिज या दिवशी भेटीला

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भन्साळी आणि नेटफ्लिक्सने मिळून हीरामंडीचा धमाकेदार ट्रेलर रिलीज केला आहे. या मालिकेत मनीषा कोईराला व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, संजीदा शेख, रिचा चढ्ढा, शर्मीन सहगल, फरदीन खान, शेखर सुमन, ताहा शाह आणि अध्यायन सुमन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ही सीरिज १ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :मनिषा कोईरालासंजय लीला भन्साळी