मनोज वाजपेयीच्या (Manoj Bajpayee) ‘द फॅमिली मॅन 2’ (The Family Man 2) या नुकत्याच रिलीज झालेल्या वेबसीरिजवर प्रेक्षकांच्या अक्षरश: उड्या पडल्यात. अॅमेझॉन प्राईमवर ही सीरिज रिलीज झाली. पण आता मनोज वाजपेयीने जॉब बदललाये. होय, कारण आता ‘द फॅमिली मॅन 2’ नंतर मनोज वाजपेयीने आता नेटफ्लिक्सच्या नव्या सीरिजची तयारी सुरू केली आहे . नेटफ्लिक्सच्या ‘रे’ (Ray) या सीरिजमध्ये तो लीड रोलमध्ये आहे.नेटफ्लिक्सने काल एक ट्वीटकरत या सीरिजची घोषणा केली.
‘मनोज वाजपेयी लवकरच नेटफ्लिक्स सीरिज ‘रे’मध्ये दिसणार आहे. तू आता आमच्या फॅमिलीचा भाग झाल्याचा आम्हाला आनंद आहे...,’ असे नेटफ्लिक्सने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले. नेटफ्लिक्सच्या या ट्वीटवर अॅमेझॉन प्राईमने चांगलीच मजेदार प्रतिक्रिया दिली. ‘श्रीकांत, जॉब बदलण्यात मोठा ड्रास्टिक चेंज झाला असेल ना?’, असे अॅमेझॉन प्राईमने लिहिले.
मनोज वाजपेयीला आवरले नाही हसू...
नेटफ्लिक्सच्या ट्वीटला अॅमेझॉन प्राईमने दिलेले हे उत्तर पाहून मनोज वाजपेयीला हसू आवरले नाही. त्याने अॅमेझॉन प्राईमच्या ट्वीटला रिट्वीट करत उत्तर दिले. ‘हाहाहाहाहा, टॉप क्लास विनोद. जॉब नहीं रोल बदला है,’ अशा आशयाचे ट्वीट त्याने केले.
मनोज वाजपेयीने ‘द फॅमिली मॅन 2’मध्ये श्रीकांतची व्यक्तिरेखा साकारली आहे. या सीरिजमधील मनोजच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. आता तो नेटफ्लिक्सच्या ‘रे’ या नव्या सीरिजमध्ये दिसणार आहे. ही सीरिज सत्यजीत रे यांच्या कथांवर आधारित आहे. मंगळवारी याचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला. यात मनोजशिवाय केके मनेन, अली फजल, हर्षवर्धन कपूर मुख्य भूमिकेत आहेत. या सीरिजमध्ये चार वेगवेगळी पात्र आणि चार वेगवेगळ्या कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.