Join us

मुलगी नाही तर पहिल्यांदा तिच्या रोल नंबरच्या प्रेमात पडला होता मनोज वाजपेयी, वाचा मजेदार किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 11:42 AM

Manoj Bajpayee First Love : पीयूष पांडे लिखित मनोज वाजपेयीची बायोग्राफी 'कुछे पाने की जिद' मध्ये मनोज वाजपेयीच्या पहिल्या प्रेमाचा किस्सा दिला आहे. पेंगुइन द्वारे प्रकाशित हे पुस्तक काही दिवसांपासून चर्चेत आहे.

Manoj Bajpayee First Love : मनोज वाजपेयीची ओळख रोमॅटिक हिरोची कधी नव्हतीच. रोमॅंटिक हिरो सोडून त्याने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. पण अनेकांना हे माहीत नसेल की, रिअल लाइफमध्ये तो फारच रोमॅंटिक आहे.  जेव्हा तो १२व्या वर्गात होता तेव्हा पहिल्यांदा तो प्रेमात पडला होता. पीयूष पांडे लिखित मनोज वाजपेयीची बायोग्राफी (Manoj Bajpayee biography) 'कुछे पाने की जिद' )(Kuch paane ki jid) मध्ये मनोज वाजपेयीच्या पहिल्या प्रेमाचा किस्सा दिला आहे. पेंगुइन द्वारे प्रकाशित हे पुस्तक काही दिवसांपासून चर्चेत आहे.

मुलगी नाही रोल नंबरच्या पडला होता प्रेमात

मनोज वाजपेयी पहिल्यांदा रोल नंबरच्या प्रेमात पडला होता. तसं हे जरा अजबच आहे. पण हा रोल नंबर त्याच्या जीवनात वेगळाच आनंद आणत होता. पीयूष पांडेने लिहिलं की, 'दिल्ली मनोजचं मन दुखावलं. असं नाही की, मनोज पहिल्यांदाच प्रेमात पडला होता. १२ व्या वर्गात शिकत असतानाही तो प्रेमात पडला होता. ज्यानंतर तिला क्रशचं नाव देण्यात आलं होतं. या प्रेमाची कहाणी सुद्धा फार वेगळी आहे. पहिल्यांदा मनोज मुलीच्या नाही तर तिच्या रोल नंबरच्या प्रेमात पडला होता'.

'जेव्हा क्लासमध्ये रोल नंबर चौरेचाळीस बोललं जायचं आणि क्लासमध्ये प्रेजेंट सर आवाज येत होता तेव्हा मनोजच्या चेहऱ्यावर एक वेगळीच स्माइल येत होती. ज्याला इंग्रजीत ब्लश करणं म्हणतात. क्लासमध्ये मुलांनी त्यांच्या आवडत्या मुलींची निवड त्यांना माहीत न होऊ देता त्यांच्या रोल नंबरवरून केली होती. यामुळे मित्र मनोजला 'फोर्टीफोरवा' नावाने हाक मारत होते'.

कॉलेजच्या मैदानात केलं प्रपोज

पुस्तकात मनोजच्या काही मित्रांचाही उल्लेख आहे. त्यातील एक अनीश रंजनने सांगितलं की, 'प्रपोज करण्याची वेळ आली तेव्हा आम्ही एक आयडिया केला.  मनोजचा एका भाचा तिथे शिकत होता, तर एक-दोन दिवस क्लासमध्ये सर्वांना सांगण्यात आलं की, हा मुलगा मनोजचा भाचा आहे. मग एक-दोन दिवसांनी त्या मुलाने मुलीसमोर जाऊन तिला 'मामी' म्हटलं. मनोज एका दुसरा मित्र राजकुमार सिंहने सांगितलं की, 'मी घटनास्थळी नव्हतो. पण मला सांगण्यात आलं की, कॉलेजच्या ग्राउंडमध्ये मनोजने मुलीला आय लव यू म्हटलं. सगळे मित्र उत्साहित होते. आता प्रपोज केल्यावर मनोज अडून बसला होता की, तिनेही उत्तर द्याव. पण मुलगी म्हणाली - नंतर'.

तरूणपणातील मनोज वाजपेयीची ही बाब त्याच्या फॅन्ससाठी फार वेगळी आहे. मनोजने दिल्लीतील एका तरूणीसोबत लग्न केलं होतं. पण फिल्म इंडस्ट्रीतील स्ट्रगल काळात दोघांचं घटस्फोट झाला. नंतर त्याची भेट करीब सिनेमाची अभिनेत्री नेहा(शबाना रजा)सोबत झाली. २००६ मध्ये दोघांनी लग्न केलं. 

टॅग्स :मनोज वाजपेयीबॉलिवूडइंटरेस्टींग फॅक्ट्स