‘सोन चिरैया’सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सुशांत सिंग राजपूतसह भूमी पेडणेकर,मनोज वाजपेयी, आशुतोष राणा, रणवीर शौरी यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. यात अभिनेता मनोज वायपेयी ठाकूर डाकू मान सिंगची भूमिका साकारतोय. ही भूमिका साकारताना त्याला मान सिंहच्या आयुष्य जवळून जाणून घेण्याची उत्सुकता लागली. त्यानंतर तो मान सिंगच्या गावात जाऊऩ पोहोचला गावतल्या लोकांकडून त्याच्याबाबत माहिती घेतली. मान सिंह हा आगऱ्यातल्या कुविख्यात डाकू होता. त्याच्यावर लोकांची 185 हत्याच्या गुन्ह्याची नोंद आहे.
अभिषेक चौबे दिग्दर्शित सोन चिरैयामध्ये दमदार अॅक्शन पाहायला मिळणार आहे. त्याकाळात चंबळच्या खो-यात दरोडेखोरांचे साम्राज्य होते. खरे तर याआधीही दरोडेखोरांवरचे अनेक सिनेमे आपण पाहिलेत. पण त्यासगळ्या चित्रपटाच्या केंद्रस्थानी केवळ दरोडा, हिंसाचार, लूटमार हेच आपल्याला बघायला मिळाले. ‘सोन चिरैया’मध्ये मात्र एक वेगळी कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचा दावा मेकर्सकडून केला जात आहे. 1 मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.